धार्मिक व जातीय तेढ निर्माण करणाऱ्या अफवांवर विश्वास ठेवू नका - वपोनि दिलीप गुजर
 वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप गुजर...


पनवेल दि. २३ (संजय कदम) : कळंबोली पोलीस ठाणे हद्दीत राहणाऱ्या नागरिकांनी समाजात तेढ निर्माण करणाऱ्या कोणत्याही घटनांवर विश्वास ठेवू नये तसेच कोणतेही आक्षेपार्ह पोस्ट किंवा मजकूर निदर्शनास आल्यास तात्काळ पोलीस ठाण्याशी संपर्क साधण्याचे आवाहन कळंबोली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप गुजर यांनी केले आहे. 
             मागील काही काळात महाराष्ट्रामध्ये काही समाजकंटकांकडून धार्मिक व जातीय तेढ निर्माण केले जात आहे. या पार्श्वभूमीवर कळंबोली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप गुजर यांनी कळंबोली हद्दीतील सर्व जाती-धर्माचे लोक एकोप्याने राहावे यासाठी रहिवाशांना समाजात तेढ निर्माण करणाऱ्या कोणत्याही घटनांवर किंवा अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन केले आहे. तसेच कायदा व सुव्यवस्था  बिघडवणारी कोणतीही पोस्ट, क्लिप, मजकूर निदर्शनास आल्यास तात्काळ पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा अश्या सूचना केल्या आहेत.
Comments
Popular posts
देशाचे पुढचे राजकारण आपल्या मनासारखे होण्यासाठी इंडियाने एकरूप होऊन काम करावे लागेल - शिवसेना नेते मा.खासदार अनंत गीते..
Image
नैना हटाव शेतकरी बचाव अंतर्गत सिडकोविरोधातील शेतकऱ्यांच्या आमरण उपोषणाला शिवसेनेचा(उद्धव बाळासाहेब ठाकरे) सक्रिय पाठिंबा..
Image
बाबासाहेब लिगल पँथर संघटनेच्या नेतृत्वात पनवेलमध्‍ये प्रथमच भव्य संविधान सम्मान शोभायात्रा(मिरवणुक)संपन्न...
Image
१५ वर्षीय मुलाला कायदेशीर रखवालीतून नेेले पळवून...
Image
तुरमाळे येथील नैना विरोधातील आमरण उपोषणास भेट देत शिवसेना नेते मा.खासदार अनंत गीते यांनी दिला पाठींबा...
Image