वाहतूक नियमनाचे पालन करा, अन्यथा कारवाईला सामोरे जा : वरिष्ठ पोलीस निरीक्षक हरिभाऊ बानकर...
वरिष्ठ पोलीस निरीक्षक हरिभाऊ बानकर...
रिक्षा चालकांची घेतली बैठकीत दिल्या सूचना 

पनवेल/प्रतिनिधी :-- खांदेश्वर रेल्वे स्टेशन परिसरातील रस्त्यावर रिक्षाचालक बेदरकारपणे रिक्षा चालवतात. वाहतूक नियम पाळत नाहीत. ओव्हरसीट प्रवासी वाहतूक जोमात सुरू आहे. यावर नियंत्रण कधी येणार असा प्रश्न आहे. बॅच-बिल्ला लावणे, ओव्हरसीट प्रवासी वाहतूक करू नये, विशिष्ट ठिकाणीच थांबा घ्यावा, असे आव्हान रिक्षाचालकांना पोलीस उपायुक्त तिरुपती काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक हरिभाऊ बानकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक शिर्के व पोउपनिरी भद्रे यांनी रिक्षा चालकांची बैठक घेत वाहतूक नियमांचे पालन करण्याच्या सूचनाही दिल्या केले आहे. 

कळंबोली, कामोठे परिसरात दिवसेंदिवस रिक्षाची संख्या वाढत चालली आहे. यामुळे बेशिस्त वाहतुकीमुळे परिसरातील विविध चौकात वाहनांची कोंडी होऊन पादचार्‍यांना त्रास सहन करावा असल्याने नागरीकांच्या तक्रारी वाढल्या होत्या. रिक्षा चालकांना शिस्त लागावी या पार्श्‍वभूमीवर कळंबोली  वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक हरिभाऊ बानकर यांनी खांदेश्वर रेल्वे स्टेशन परिसरातील रीक्षा चालकांची बैठक घेऊन वाहतूक नियमांचे पालन करावे अन्यथा कायदेशीर कारवाईला सामोरे जावे, असा सूचक इशारा दिला. वाहतुकीची कोंडी होणार नाही तसेच नागरीकांना येण्या-जाण्यास अडचणी निर्माण होणार नाहीत, अशा पद्धत्तीने वाहने लावावीत, असे त्यांनी रीक्षा चालकांना बजावले. रिक्षांमध्ये मुख्यत: तीन प्रवासी घेण्याची मुभा असताना आठ-दहा प्रवासी वाहतूक होते. काही रिक्षाचालकांनी पाठीमागील बाजूस जाळी लावली अाहे. त्यातूनही प्रवासी वाहतूक सुरूच असते. काहीजण संगीत डेक (साऊंड सिस्टिम बाॅक्स) ठेवले असून त्यावर प्रवासी बसवितात. चौकात चालक सीटवर दोन-तीन प्रवासी बसवून घेतात. यावर रिक्षा चालकांचे नियंत्रण असायला हवे.. अन्यथा रिक्षा चालकांवर कारवाई करण्यात येईल असा इशारा हरिभाऊ बानकर यांनी दिला.

या नियमांची सक्ती...

1) स्क्रॅप रिक्षा चालवू नका.
2) फ्रंट सीट तीन पेक्षा जास्त प्रवासी घेता येणार नाही.
3) पाठी मागील जाळी पूर्णत: बंद पाहिजे. 
4) रिक्षा चालकां जवळ वाहन परवाना, कागदपत्रे पाहिजेत. 
5) बॅच बिल्ला लावावा, ड्रेसकोड पाहिजे.

पोलीस उपायुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली खांदेश्वर रेल्वे स्टेशन हद्दीतील रिक्षा चालक यांची  बैठक घेऊन भाडे नाकारणे, युनिफॉर्म परिधान करणे, रिक्षा या मिटरप्रमाणे चालविणे व अतिरिक्त प्रवासी न घेणे , मद्यपान करून वाहन न चालवणे आणि रिक्षा मीटर प्रमाणे चालविणे,  जास्त भाडे न आकारणे याबाबत सूचना  देण्यात आल्या व मार्गदर्शन करण्यात आले. सदर बाबत तक्रारी प्राप्त झाल्यास कडक कायदेशीर कारवाई करण्यात येईल याबाबत सर्व उपस्थितांना अवगत करण्यात आले. तसेच विशेषतः महिला प्रवाशी यांचेशी सौजन्याने वागण्याबाबत सूचना दिल्या.

- हरिभाऊ बानकर - वरिष्ठ पोलीस निरीक्षक
कळंबोली वाहतूक शाखा
Comments