तळोजा येथील नवी मुंबई वेस्ट मॅनेजमेंटच्या प्रकल्पात करण्यात आला कोट्यवधी रुपयांचा गांजा नष्ट....
 कोट्यवधी रुपयांचा गांजा नष्ट करण्यात आला..



पनवेल दि.२०(वार्ताहर): पनवेल जवळील तळोजा औद्योगिक वसाहत येथील  नवी मुंबई वेस्ट मॅनेजमेंटच्या प्रकल्पात कोट्यवधी रुपयांचा गांजा नष्ट करण्यात आला आहे.
      अंमली पदार्थ विरोधी पथक अर्थात एनसीबीच्या मुंबई झोनने महामुंबईतील विविध कारवायांत जप्त केलेल्या एक हजार शहात्तर किलो गांजा पनवेल जवळील तळोजा येथील केंद्रात नष्ट केला. नष्ट केलेल्या गांजाची किंमत पंधरा कोटीहून अधिक आहे. तळोजा एमआयडीसीतील नवी मुंबई वेस्ट मॅनेजमेंटच्या प्रकल्पात रासायनिक प्रक्रिया करून हा गांजा नष्ट करण्यात आला. अंमली पदार्थांची विधिवत विल्हेवाट लावण्यासाठी स्थापन केलेल्या, मुंबईच्या उच्चस्तरीय औषध विल्हेवाट समितीच्या मंजुरी नंतर हा एक हजार शहात्तर किलो गांजा नष्ट करण्यात आला. यावेळी मुंबई एनसीबी, उच्चस्तरीय औषध विल्हेवाट समितीचे सदस्य आणि इतर अधिकारी हजर होते.  दरम्यान अमली पदार्थांच्या तस्करीविरुद्ध विशेष मोहीम यापुढे ही सुरू राहणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
फोटो: गांजा नष्ट करताना अधिकारी
Comments
Popular posts
देशाचे पुढचे राजकारण आपल्या मनासारखे होण्यासाठी इंडियाने एकरूप होऊन काम करावे लागेल - शिवसेना नेते मा.खासदार अनंत गीते..
Image
नैना हटाव शेतकरी बचाव अंतर्गत सिडकोविरोधातील शेतकऱ्यांच्या आमरण उपोषणाला शिवसेनेचा(उद्धव बाळासाहेब ठाकरे) सक्रिय पाठिंबा..
Image
बाबासाहेब लिगल पँथर संघटनेच्या नेतृत्वात पनवेलमध्‍ये प्रथमच भव्य संविधान सम्मान शोभायात्रा(मिरवणुक)संपन्न...
Image
१५ वर्षीय मुलाला कायदेशीर रखवालीतून नेेले पळवून...
Image
तुरमाळे येथील नैना विरोधातील आमरण उपोषणास भेट देत शिवसेना नेते मा.खासदार अनंत गीते यांनी दिला पाठींबा...
Image