कोलंबोमध्ये अडकलेल्या १४ भारतीय नाविकांना परत आणण्यास ऑल इंडिया सिफेरर्स युनियनच्या प्रयत्नांना यश....
  युनियनच्या प्रयत्नांना यश....


पनवेल दि.१५ (संजय कदम) : सिफेरर्स सेफ्टी व सिफेरर्स त्रृटीच्या नावाखाली श्रीलंका सरकारने कोलोम्बो मध्ये गेल्या 4 वर्षापासून सुरक्षितेअभावी अटक केलेल्या १४ भारतीय नाविकांना ॲाल इंडिया सिफेरर्स यूनियनच्या सतत च्या पाठपूराव्याने श्रीलंकन कोर्टाने त्यांच्या सुटकेची नोटीस जाहीर केली आहे. त्यामुळे लवकरच हे सर्व नाविक आपल्या घरी परतणार आहेत. या भारतीय नाविकांनी व त्यांच्या कुटुंबीयांनी ॲाल इंडिया सिफेरर्स यूनियनचे अध्यक्ष संजय पवार यांचे आभार मानले आहे. 
                 साई आरंभ जहाजावर काम करणारे १४ भारतीय नाविकांना श्रीलंकन सरकारने सप्टेंबर २०१९ मध्ये कोलंबो पोर्टवर सिफेरर्स सेफ्टी व सिफेरर्सचे वेतन सर्वेक्षणात त्रृटी आढळल्याने ३ महीन्यासाठी अटक केली होती. परंतू पोर्टने आकारलेले शुल्क देण्यास कंपनीने नकार दिल्याने त्यांचा कालावधी वाढतच गेला. ॲाल इंडिया सिफेरर्स यूनियनचे कार्य लक्षात घेता सप्टेंबर २०२२ मध्ये साई आरंभ या जहाजाची तक्रार यूनियन ला प्राप्त झाली नंतर युनियनचे अध्यक्ष संजय पवार यांनी तात्काळ भारतीय नाविकांना भारतात परत आणण्यास प्रयत्न सुरु केले. संजय पवार यांच्या मार्गदर्शनाखाली यूनियनचे कार्याध्यक्ष अभिजीत सांगळे यांनी जहाजावर संपर्क करून तेथील सर्व पथकाची नावे व अहवाल मागवून घेतला. त्यानंतर यूनियनने वकीलाचा सल्ला घेवून त्यावर योग्य ती कारवाई सुरु केली. युनियनने जहाजावरील कॅप्टन अहमद कापडे व त्यांचे वकील तसेच आयटीएफ चे श्रीलंकन प्रमूख रंजन परेरा यांच्याशी संपर्क साधून नाविकांच्या सुटकेच्या हालचाली हलवण्यास सूरूवात केली तसेच यूनियन चे जनरल सेक्रेटरी अमर सिंग ठाकूर व अधायक्ष संजय पवार यांनी श्रीलंकन राजदूतांची भारतात भेट घेतली व गेल्या ४ वर्षांपासून अडकलेले जहाज साई आरंभ मधील सिफेरर्स ला भारतात आणण्यासाठी मदत मागितली. त्यांच्या सततच्या पाठपूराव्याने या नाविकांना श्रीलंकन कोर्टाने भारतात परतण्याची परवानगी दिली असून त्यांच्या सूटकेची नोटीस जाहीर केली आहे. त्यामुळे लवकरच हे सर्व नाविक आपल्या घरी परतणार आहेत. या भारतीय नाविकांनी व त्यांच्या कुटुंबीयांनी ॲाल इंडिया सिफेरर्स यूनियनचे अध्यक्ष संजय पवार यांचे आभार मानले आहे. 
फोटो : कोलंबोमध्ये अडकलेल्या भारतीय नाविकांना यांना परत आणण्यास ऑल इंडिया सिफेरर्स युनियन च्या प्रयत्नांना मोठे यश
Comments