आता निवडणूक लढवायची ती फक्त जिंकण्यासाठीच ; भगवा फडकवण्यासाठी शिवसैनिकांनी सज्ज व्हा -शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) उपनेते विजय कदम..
शिवसेना उपनेते विजय कदम...

पनवेल दि.१३ (संजय कदम): आगामी काळात येणारी पनवेल महानगरपालिका, विधानसभा व लोकसभा निवडणूक ही फक्त जिकण्याच्या उद्देशानेच लढवावी यासाठी शिवसैनिकांनी सज्ज व्हावे तसेच आत्ता पासूनच मतदारांपर्यंत पोहचण्याचे आवाहन शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) उपनेते विजय कदम यांनी आज खारघर येथील शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शन मेळाव्यात केले.
खारघर येथील शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) मध्यवर्ती कार्यालयात आज पनवेल विधानसभा मतदारसंघ -१८८ च्या पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) उपनेते, रायगड, पालघर व ठाणे विभागाचे विभागीय समन्व्यक विजय कदम यांचे प्रामुख्याने मार्गदर्शन लाभले. यावेळी जिल्हा समन्व्यक  अनिल चव्हाण, जिल्हा प्रमुख शिरीष घरत, विस्तारक वैभव सावंत,जिल्हा सल्लागार शिरीष बुटाला, उपजिल्हाप्रमुख रामदास पाटील, भरत पाटील, विधानसभा संघटक दिपक निकम, विधानसभा समन्वयक प्रदीप ठाकुर,तालुका संपर्कप्रमुख योगेश तांडेल, तालुका प्रमुख ज्ञानेश्वर बडे, संदीप तांडेल, महानगर समन्वयक दिपक घरत, महानगर संघटक डी.एन.मिश्रा, शशिकांत डोंगरे, विधानसभा संघटिका रेवती सकपाळ,तालुका संघटिका सुजाता कदम, युवासेना उपजिल्हाधिकारी अवचित राऊत, उपतालुका प्रमुख, उपमहानगर प्रमुख, शहर प्रमुख,शहर संघटक, शहर समन्वयक, उपशहर प्रमुख, विभाग प्रमुख, उपविभाग प्रमुख, उप-विभाग प्रमुख, (ग्रामीण विभाग प्रमुख, उप-विभाग प्रमुख), महिला आघाडी उप-तालुका संघटिका, उपमहानगर संघटिका, शहरसंपर्क संघटिका, शहर संघटिका,युवासेना पदाधिकारी व युवतीसेना पदाधिकारी आदी पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी बोलताना शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) उपनेते विजय कदम यांनी सांगितले की, संपूर्ण देशात शिवसेनेची सुरु असलेली घोडदौड पाहून विविध पक्षाचे राजकीय नेते आजही शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेण्यासाठी व त्यांचे मार्गदर्शन घेण्यासाठी येत आहेत. देशातील ५ सर्वाधिक लोकप्रिय असलेल्या नेत्यांमध्ये उद्धवजी ठाकरे यांचे नाव आहे. भावी काळात ते देशाचे नेतृत्व करतील याचा विश्वास सर्वांना असल्याने सर्वपक्षीय नेते त्यांची भेट घेत आहेत. अश्या कणखर नेतृत्वाचे आपण शिवसैनिक असल्याचा आपल्याला अभिमान आहे. सध्या सुडापोटी व पैशाच्या बळावर सत्तेचे राजकारण राज्यात सुरु आहे, पण ते फार काळ टिकणार नसून प्रत्येक मतदार संघात ५० हजाराची सदस्य नोंदणी शिवसेनेची झाल्यास तेथील आमदार हा शिवसेनेचाच असेल यात तिळमात्र शंका नाही. जिल्हाप्रमुख शिरीष घरत यांचे कामकाज हे कौतुकास्पद असून आगामी काळातील पनवेल महानगरपालिकेसह विधानसभा व लोकसभा निवडणुकीत निश्चितच भगवा फडकेल यासाठी प्रत्येक पदाधिकाऱ्याने आज पासूनच कामाला लागावे व पैशाने राजकारण करणाऱ्यांची मक्तेदारी मोडीत काढावी हे काम शिवसैनिक निश्चितच करू शकतात असा विश्वास सुद्धा त्यांनी यावेळी व्यक्त केला आहे. प्रत्येक निवडणूक हि जिकंण्यासाठीच लढवायची आहे. या उद्धेशाने निवणुकीला सामोरे जावे. असे आवाहन सुद्धा विजय कदम यांनी यावेळी केले. तर उपस्थितांना मार्गदर्शन करताना जिल्हा समन्व्यक  अनिल चव्हाण यांनी सांगितले की, शिवसेनेमध्ये प्रचंड ताकद आहे. हिचा वापर शिवसैनिकांनी करावा, पनवेल तालुक्यात जिल्हाप्रमुख शिरीष घरत यांनी पक्षाची ताकद वाढवली आहे  याचा प्रत्यय वेळोवेळी दिसून येत आहे. आप आपसातील हेवेदावे सोडून एकजुटीने काम केल्यास पुढचा आमदार हा शिवसेनेचाच असेल असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला. तर जिल्हाप्रमुख शिरीष घरत यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांनी जी जबाबदारी मला सोपवली आहे ती मी यशस्वीपणे पार पाडीन असा विश्वास व्यक्त करत मोठ्या प्रमाणात इतर पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते पक्ष नेतृत्वावर विश्वासू ठेवत शिवसेनेत प्रवेश करीत आहेत. त्यामुळे पक्षाची ताकद वाढली असून आगामी सर्व निवडणुकीत आपल्याच पक्षाचे उमेदवार कसे विजयी होतील याकडे शिवसैनिकांनी लक्ष केंद्रित करावे असे आवाहन त्यांनी केले. जिल्हा सल्लागार शिरीष बुटाला यांनी सुद्धा मार्गदर्शन करताना सांगितले की, संघटन सामर्थ्य वाढवा  संघटितपणे काम केले तर आगामी सर्व निवडणुका सहजपणे जिंकू शकू यात कोणतेही दुमत नसल्याचे सांगितले. तर समन्व्यक वैभव सावंत यांनी सुद्धा  प्रत्येक निवडणुकीत नियोजन महत्वाचे असून शिवसेनेमध्ये प्रत्येक बाबतीत नियोजन असल्याने आज यशाचे शिखरे आपण गाठत असल्याचे सांगितले. यावेळी शिवसेना पदाधिकाऱ्यांसह महिला आघाडी, युवासेना, युवतीसेनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. 
फोटो:  शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) उपनेते विजय कदम मार्गदर्शन करताना
Comments
Popular posts
पनवेल जवळील पाच पीर डोंगर येथे ट्रेकींगसाठी जावून भरकटलेल्या ८ पर्यटकांना पनवेल शहर पोलिस व स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने केले रेस्क्यु..
Image
दुबईतुन गुंतवणुकीचे खोटे आमिष देणाऱ्या टोळीतील एका आरोपीस "सायबर सेल" पनवेल यांनी शिताफीने केले जेरबंद ..
Image
पनवेल शहर परिसरातील चर्चमधील चोरीचे गुन्हे उघडकीस ; पनवेल शहर पोलिसांची धडक कारवाई..
Image
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले बाळासाहेब ठाकरे राज्यस्तरीय फिल्म फेस्टिवलच्या पोस्टरचे अनावरण..
Image
शेतकऱ्यांना सरसकट कर्ज माफी मिळण्यासाठी पनवेल शहर जिल्हा कॉंग्रेसतर्फे आंदोलन..
Image