शिवसेना जिल्हाप्रमुख रामदास शेवाळे यांच्या माध्यमातून शासन मान्यता कोर्सेस करणाऱ्या विद्यार्थ्यांना मदतीचा हात...
 विद्यार्थ्यांना मदतीचा हात...

पनवेल दि.०२ (संजय कदम) : शिवसेना जिल्हाप्रमुख रामदास शेवाळे यांनी शासनमान्यता प्राप्त कोर्सेस करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मदतीचा हात दिला आहे. त्यांच्या माध्यमातून कळंबोली विभागातील शासन मान्यता कोर्सेस करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या एकूण प्रवेश शुल्कापैकी एका तृतीय फी स्वखर्चातुन देणार आहेत. याचा शुभारंभ  रामदास शेवाळे यांच्या हस्ते करण्यात आला. 
               पनवेल तालुक्यातील शेडुंग येथील छत्रपती शिवाजी महाराज टेक्निकल इन्स्टिट्यूटमध्ये शासन मान्यता कोर्सेस करीता कळंबोली विभागातील अनेक युवक-युवतींनी प्रवेश घेतला आहे. मात्र हे कोर्सेस शिकण्यासाठी अनेक गरीब विद्यार्थ्यांची इच्छा असूनही फक्त पैशाच्या अभावी त्यांना आपल्या स्वप्नांच्या मागे धावत येत नाही. या विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी शिवसेना जिल्हाप्रमुख रामदास शेवाळे यांनी एक हात पुढे केला आहे. छत्रपती शिवाजी महाराज टेक्निकल इन्स्टिट्यूटमध्ये शासन मान्यता कोर्सेस करीता प्रवेश घेणाऱ्या कळंबोली विभागातील युवक-युवतींच्या एकूण प्रवेश शुल्कापैकी एक तृतीय शुल्क आपल्या स्वखर्चातून देणार आहे. ज्या विद्यार्थ्यांनी या कोर्सेसमध्ये प्रवेश घेतला आहे त्यांच्या अभ्यासक्रमाचा रामदास शेवाळे यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला.
फोटो : रामदास शेवाळे यांच्या हस्ते अभ्यासक्रमाचा शुभारंभ
Comments
Popular posts
देशाचे पुढचे राजकारण आपल्या मनासारखे होण्यासाठी इंडियाने एकरूप होऊन काम करावे लागेल - शिवसेना नेते मा.खासदार अनंत गीते..
Image
नैना हटाव शेतकरी बचाव अंतर्गत सिडकोविरोधातील शेतकऱ्यांच्या आमरण उपोषणाला शिवसेनेचा(उद्धव बाळासाहेब ठाकरे) सक्रिय पाठिंबा..
Image
बाबासाहेब लिगल पँथर संघटनेच्या नेतृत्वात पनवेलमध्‍ये प्रथमच भव्य संविधान सम्मान शोभायात्रा(मिरवणुक)संपन्न...
Image
१५ वर्षीय मुलाला कायदेशीर रखवालीतून नेेले पळवून...
Image
तुरमाळे येथील नैना विरोधातील आमरण उपोषणास भेट देत शिवसेना नेते मा.खासदार अनंत गीते यांनी दिला पाठींबा...
Image