रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशन तर्फे सोळा वर्षाखालील खेळाडूंची संघ निवड...
रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशन तर्फे सोळा वर्षाखालील खेळाडूंची संघ निवड...
 
पनवेल / वर्ताहर : -      रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशन तर्फे सोळा वर्षाखालील खेळाडूंची संघ निवड चाचणी ८ व ९ एप्रिल 2023 रोजी रिलायन्स फाउंडेशन स्कूल लोधीवली येथे आयोजित करण्यात आली होती सुमारे 150 खेळाडू या चाचणीमध्ये सहभागी झाली होते. 
रायगड जिल्हा  क्रिकेट असोसिएशन तर्फे निवड समितीचे सदस्य म्हणून योगेश वाघ (कामोठा) , विनय पाटील (खारघर) , उमाशंकर (खोपोली) आणि रायगड जिल्हा निवड समितीचे अध्यक्ष प्रीतम कैया उपस्थित होते. या निवड चाचणीला रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष चंद्रकांत मते देखील उपस्थित होते तसेच बहुतुले, संदीप पाटील, हिरवे, योगेश पवार व सचिन मते  हे सदस्य उपस्थित होते
रिलायन्स इंडस्ट्री व कोंढाळकर अकॅडमी चे प्रशिक्षक  राजेंद्र कोंढाळकर ह्यांच्या तफॆ॔ या निवड चाचणीसाठी उत्कृष्ट दर्जाचे आयोजन करण्यात आले होते
रिलायन्स इंडस्ट्रीचे एचआर हेड थॉमस ईसो , रिलायन्स इंडस्ट्री पेट्रोल केमिकल चे प्रेसिडेंट आशु गग॔ , मदणे ,  मुजावर  व  मनोहर अहिर ह्यांनी या निवड चाचणीला मदत केल्याबद्दल त्यांचे रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशन तर्फे आभार मानले.
Comments