चिंचपाडा परिसरातून दोन मोटारसायकल चोरांना गुन्हे शाखा कक्ष २ च्या पथकाने केले जेरबंद...
गुन्हे शाखा कक्ष २ च्या पथकाने केले जेरबंद...


पनवेल दि.०५ (संजय कदम) : मोटारसायकल चोरी करणाऱ्या दोन गुन्हेगारांना गुन्हे शाखा कक्ष २ च्या पथकाने सीसीटीव्ही फुटेज तसेच गोपनीय बातमीदारांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे पनवेल जवळील चिंचपाडा परिसरातून चोरीच्या मोटारसायकलीसह ताब्यात घेतले आहे.
                       पनवेल शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसरात अजिंक्य बिल्डिंग येथून दीपक चौधरी यांची मोटारसायकल अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची तक्रार पनवेल शहर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली होती. सदर तक्रारीनुसार पनवेल शहर पोलीस ठाण्याचे गुन्हे शाखेचे पथक व गुन्हे शाखा कक्ष २ चे पथक गुन्ह्याचा समांतर तपास करत असताना गुन्हे शाखा कक्ष २ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि प्रवीण फडतरे, पोहवा सचिन पवार , पोहवा रुपेश पाटील, पोहवा रणजीत पाटील, पोहवा रमेश शींदे, पोहवा तुकाराम सूर्यवंशी, पोहवा अजीत पाटील ,पोहवा सागर रसाळ, पोहवा निलेश पाटील यांच्या पथकाने घटनास्थळ परिसरातील आरोपींचे सीसीटीव्ही फुटेज प्राप्त केले तसेज गोपनीय बातमीदारांकडून फुटेज मधील इसमांबाबत माहीती काढली असता सदर गुन्ह्यातील संशयित दोन इसम चिंचपाडा पुलाखाली येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार चिंचपाडा पुलाखाली मोटरसायकल (एमएच ४६ व्ही १०५१) वरून आलेले आरोपी अब्दुल रेहमान बकर (रा.ओवेगांव) आणि सुलतान गुलशन खान (रा.ओवेगांव) यांना मोटरसायकल सह ताब्यात घेऊन त्यांच्याकडे अधिक चौकशी केली असता त्यांनी सदर गुन्हा केल्याची कबुली दिली. यातील एक आरोपी हा सराईत गुन्हेगार असल्याने त्याच्या अटकेमुळे अजूनही काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता वर्तवण्यात येत असून याबाबत पुढील तपास पनवेल शहर पोलीस करीत आहेत. 
फोटो : सराईत मोटारसायकल चोरांसह चोरीची गाडी
Comments