के.गो. लिमये सार्वजनिक वाचनालय व ग्रंथालयाच्यावतीने वसंतोत्सव व्याख्यानमाला संपन्न...
 वसंतोत्सव व्याख्यानमाला संपन्न...

पनवेल / वार्ताहर : -  के.गो. लिमये सार्वजनिक वाचनालय व ग्रंथालयाच्या वतीने शुक्रवार दिनांक ७/४/२०२३ ते ९/४/२०२३ या कालावधीत सायंकाळी संस्थेमध्ये व्याख्यानमाला आयोजित करण्यात आली होती. यावेळी सर्वप्रथम संस्थेच्या अध्यक्षा अॅड. श्रीमती सुनिता जोशी यांनी प्रमुख वक्त्यांचे स्वागत करून आपल्या प्रास्ताविक भाषणात संस्थेच्या कार्याविषयी माहिती सांगितली, संस्थेचे कार्यवाह काशिनाथ जाधव यांनी प्रमुख वक्त्यांचा परिचय करून दिला.

दिनांक ७/४/२०२३ रोजी डॉ. प्राची आंबोलकर यांचे "आहाराची गुरुकिल्ली" यावर व्याख्यान झाले. त्यांनी आपल्या भाषणात लहानांपासून ते मोठ्यांपर्यंतचा आहार कसा असावा याबबत उत्तम मार्गदर्शन केले. त्याचप्रमाणे श्रोत्यांच्या प्रश्नांची समर्पक उत्तरे दिली.

दिनांक ८ / ४ / २०२३ रोजी दैनिक रामप्रहरचे मुख्य संपादक देवदास मटाले यांनी वृत्तपत्रे आणि आपण या विषयावर भाषण करतांना प्रत्यक्ष श्रोत्यांशी संवाद साधून त्यांनी विषय मांडला. श्रोते आणि व्याख्याते हे एकाच मानसिक पातळीवर आल्याने संवाद उत्तरोत्तर वाढत गेला. खेळीमेळीचे वातावरण निर्माण करून आपले म्हणणे श्रोत्यांसमोर उत्तम मांडले. श्रोत्यांनी विचारलेल्या प्रश्नांना समर्पक उत्तरे दिली.

दिनांक ९/४/२०२३ रोजी अॅड. श्री सचिन कल्याणकर यांचे सहकारी गृहनिर्माण संस्था, इमारत पुनर्विकास व पुनर्विकसन प्रकल्पाचे बांधकाम व्यवस्थापन याबद्दल माहिती सांगून त्याबाबतचे सादरीकरण केले त्या व्याख्यानाला श्रोतावर्ग मोठ्यासंखेने उपस्थित होता. त्यांनी श्रोत्यांच्या शंकांचे निरसन केले. या कार्यक्रमाला संस्थेचे सहकार्यवाह सौ. जयश्री शेट्ये, उपाध्यक्ष श्याम वालावलकर, श्री रमेश चव्हाण, श्री. प्रशांत राजे, श्री. सुनील खेडेकर, सौ. अॅड माधुरी थळकर, श्री. विनायक वत्सराज, सौ. हिमालिनी कुलकर्णी उपस्थित होत्या. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संस्थेची ग्रंथपाल सौ. निकेता शिंदे, लिपिक सौ.संपदा जोशी, कु. नंदिनी मंडराई, सेवक संजय दिवटे यांनी विशेष मेहनत घेतली. आभार प्रदर्शनाने कार्यक्रमाची सांगता झाली.
Comments