सावरकर गौरव यात्रेत सहभागी होण्याचे भाजपा प्रदेश सरचिटणीस विक्रांत पाटील यांचे नागरिकांना आवाहन..
 विक्रांत पाटील यांचे नागरिकांना आवाहन....
पनवेल /  (वार्ताहर) : भारतासह महाराष्ट्रातल्या जनतेच्या अस्मितेचा विषय असलेले महापुरुष स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्याविषयी माथेफिरू राहुल गांधी हे त्यांचं कर्तुत्व जाणून घे न घेता त्यांचा अपमान करण्याचा सातत्याने प्रयत्न करत आहेत. याविरोधात भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेच्या वतीने महाराष्ट्रातील प्रत्येक विधानसभा क्षेत्रात यात्रेची घोषणा केलेली आहे. राजकारणासाठी कुठल्याही स्तरावर जाऊ शकणाऱ्या या माथेफिरूच्या प्रवृत्तीविरोधात स्वातंत्र्यवीर सावरकर गौरव यात्रेमध्ये मोठ्या संख्येने सहभागी व्हा असे आवाहन भाजप प्रदेश सरचिटणीस विक्रांत पाटील यांनी नागरिकांना केले आहे.
  त्यागाचा, संघर्षाचे, समर्पणाचे प्रतीक म्हणजे स्वातंत्र्यवीर सावरकर आणि अशा व्यक्तिमत्व विषयी माथेफिरू राहुल गांधी हे त्यांचं कर्तुत्व जाणून घे न घेता त्यांचा अपमान करण्याचा सातत्याने प्रयत्न करत आहेत. हे कदापिही स्वीकारार्ह नसल्याने या प्रवृत्तीचा निषेध व्यक्त करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर गौरव यात्रेची घोषणा केली आहे. महाराष्ट्रातल्या प्रत्येक विधानसभेमध्ये ही स्वातंत्र्यवीर सावरकर गौरव यात्रा त्या-त्याठिकाणी मार्गक्रमण करणार आहे. १ एप्रिल पासून सुरू झालेल्या या यात्रेमध्ये सामान्य जनता, हिंदुत्ववादी संघटना त्या ठिकाणी उतरून राजकारणासाठी कुठल्याही ठराव आणि स्तरावर जाऊ शकणाऱ्या या राजकारणाविरोधात सहभागी होत आहे. त्यामुळे आपल्या पनवेलमध्ये ९ एप्रिल रोजी होणाऱ्या स्वातंत्र्यवीर सावरकर गौरव यात्रेमध्ये आपण मोठ्या संख्येने सहभागी व्हा असे आवाहन भाजप प्रदेश सरचिटणीस विक्रांत पाटील यांनी केले आहे. तसेच या सावरकर यात्रेला प्रत्येक ठिकाणी मिळणाऱ्या प्रतिसादाबद्दल नागरिकांचे आभार मानले.


फोटो : विक्रांत पाटील
Comments