रुधीर सेतू सेवा संस्था व उत्कर्ष सामाजिक कला, क्रीडा मंडळ पोदी यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिराचे आयोजन
संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिराचे आयोजन..
पनवेल / वर्ताहर : - रुधीर सेतू सेवा संस्था व उत्कर्ष सामाजिक कला, क्रीडा मंडळ पोदी यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिराचे आयोजन माजी नगरसेवक  मनोज भुजबळ यांच्या वाढदिवसानिमित्त करण्यात आले होते.
सदर आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिरामध्ये एकूण 76 रक्तदात्यांनी आपला  सहभाग नोंदवला दिनांक 10 एप्रिल 2023 रोजी पनवेल रेल्वे स्टेशन येथे टाटा मेमोरियल सेंटर खारघर यांच्या सहकार्याने  दिनांक 10 एप्रिल 2023 रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन रुधिर सेतू सेवा संस्था आणि उत्कर्ष सामाजिक कला आणि क्रीडा मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने  करण्यात आले होते.
यावेळी श्री मनोज भुजबळ, श्री प्रशांत भुजबळ ,श्री राकेश भुजबळ रुधिर सेतूचे संस्थापक श्री अमोल साखरे आणि इतर सामाजिक तसेच राजकीय कार्यकर्ते उपस्थित होते त्याचबरोबर रुधिर सेतू सेवा संस्थेचे श्री मुरलीधर डाके, श्री सचिन भिसे, सौ उज्ज्वला  भिसे, सौ संगीता साखरे आणि इतर कार्यकर्ते  उपस्थित होते. 
Comments