डॉ.संजय सोनावणे यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या खेळाडूंना दिले रोख रक्कमेचे पारितोषिक..
खेळाडूंना दिले रोख रक्कमेचे पारितोषिक..

पनवेल / दि. २३. ( संजय कदम  ) : पनवेल मधील उद्योजक , सामाजिक कार्यकर्ते व लोकशक्ती संजीवनी प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष डॉ. संजय सोनावणे यांनी दिलेल्या शब्दाप्रमाणे आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या खेळाडूना रोख रक्कमेचे पारितोषिक जाहीर केले होते ते प्रत्यक्ष कार्यक्रमांत खेळाडू व त्यांच्या कुटुंबियांकडे सुपूर्त केले.
                      
सौ.सुनीतादेवी सोनावणे ज्ञानगंगा हायस्कूल कोल्हापूर वार्षिक स्नेहसंमेलन पारितोषिक वितरण सोहळ्यासाठी विद्यालयात आलेले प्रमुख पाहुणे आंतरराष्ट्रीय स्तरावरचे खेळाडू सार्थक शेलार व आदित्य पाटील यांना प्रेरणा पुरस्कार म्हणून डाॅ. संजय सोनावणे परिवाराने जाहीर केलेल्या प्रत्येकी 11000 रु. बक्षिसाचे धनादेश आज कोल्हापूर दौऱ्यात डाॅ.संजय सोनावणे परिवाराने समक्ष खेळाडू व त्यांच्या कुटुंबियांकडे सुपूर्त केले. 

यावेळी सौ.सुनितादेवी सोनावणे ज्ञानगंगा हायस्कूल कोल्हापूर चे अध्यक्ष जी एस पाटील (बापू ) एस.आर.एस ग्रुप च्या सौ.सुनीतादेवी सोनावणे, कु.संस्कृती सोनावणे, स्वराज सोनावणे,  मुख्याध्यापक धनाजी बेलेकर , महेश पाटील,  दत्तात्रय कोळेकर , गजानन काटकर  सतीश माळवी व नितीन विभुते इ.मान्यवर उपस्थित होते. 


फोटो -  डॉ. संजय सोनावणे व इतर मान्यवरांच्या हस्ते धनादेश वाटप
Comments
Popular posts
देशाचे पुढचे राजकारण आपल्या मनासारखे होण्यासाठी इंडियाने एकरूप होऊन काम करावे लागेल - शिवसेना नेते मा.खासदार अनंत गीते..
Image
बांगलादेश मधील खुनाच्या गुन्ह्यातील आरोपींना पनवेल शहर पोलिसांकडून अटक...
Image
को.ए.सो. इंदुबाई अ.वाजेकर आणि के.वी.कन्या विद्यालय शाळा समितीच्या चेअरमनपदी प्रितम म्हात्रे यांची निवड..
Image
नैना हटाव शेतकरी बचाव अंतर्गत सिडकोविरोधातील शेतकऱ्यांच्या आमरण उपोषणाला शिवसेनेचा(उद्धव बाळासाहेब ठाकरे) सक्रिय पाठिंबा..
Image
बाबासाहेब लिगल पँथर संघटनेच्या नेतृत्वात पनवेलमध्‍ये प्रथमच भव्य संविधान सम्मान शोभायात्रा(मिरवणुक)संपन्न...
Image