श्री अक्कलकोट स्वामी महाराज पुण्यतिथीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन..
श्री अक्कलकोट स्वामी महाराज पुण्यतिथीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन..

पनवेल दि.१८ (संजय कदम) : श्री अक्कलकोट स्वामी महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त पनवेल शहरातील श्री स्वामी समर्थ मठासह आपटा येथील श्री स्वामी समर्थ मठात विविध धार्मिक व सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी परंपरेनुसार सर्व धार्मिक कार्यक्रम पार पडले तसेच यानिमित्त भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन सुद्दा करण्यात आले होते. 
                   श्री अक्कलकोट स्वामी महाराज यांच्या १४५ व्या पुण्यतिथीनिमित्त शहरातील गावदेवी पाडा येथील श्री स्वामी समर्थ मठ (मंदिर) येथे विविध धार्मिक कार्यक्रमासह आरती, भजन व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मोठ्या संख्येने भाविकांनी याचा लाभ घेतला. त्याचप्रमाणे पुण्यतिथीनिमित्त श्री स्वामी समर्थांना आंब्याची आरस करण्यात आली होती. यानिमित्ताने आयोजित विविध धार्मिक व सामाजिक कार्यक्रमांना भाविकांची मोठी गर्दी झाली होती.
फोटो : श्री स्वामी समर्थांना आंब्याची आरस
Comments