खारघरची मराठमोळ उन्नती विलास साळवी ठरली ‘मेस्मेरिक क्वीन मिस इंडिया 2023’..
‘मेस्मेरिक क्वीन मिस इंडिया 2023’..
पनवेल / दि.२४ (संजय कदम) : गुरमीत गार्हा ग्रूमिंग स्कूल प्रस्तुत ‘मेस्मेरिक मिस इंडिया 2023’ स्पर्धेत खारघर येथे राहणाऱ्या उन्नती विलास साळवी हिने ‘मेस्मेरिक क्वीन मिस इंडिया 2023’ हा किताब मिळविला. या स्पर्धसाठी प्रमुख पाहुणे म्हणून बॉलिवूड मधील प्रसिद्ध अभिनेत्री ईशा कोपिकर, डान्स कोरिओग्राफर सिंधू नायर उपस्थित होते.
नेरुळ येथील एनसीआरडी स्टर्लिंग बँक्वेट हॉल येथे झालेल्या अंतिम फेरीत उन्नती विलास साळवी हिने यास्मिन शेख व लगन थल यांच्यावर मात करत ‘मेस्मेरिक क्वीन मिस इंडिया 2023’ चा किताब मिळविला. या स्पर्धेत यास्मिन शेख प्रथम उपविजेती तर लगन थल दुसरी उपविजेती ठरली. वीस वर्षीय उन्नती हि खारघरची रहिवाशी असून तिचे वडील हे पोलीस खात्यात कार्यरत आहेत. ती नवी मुंबई येथील येरळा मेडिकल कॉलेज मधील बीएएमएसमध्ये तृतीय वर्षात शिकत आहे. उन्नतीला आयुष्यात सर्जन होण्याची इच्छा आहे. उन्नती साळवी हिने यापूर्वी 'एविए एन्टरटेनमेंट' तर्फे दुबईत आयोजित करण्यात आलेल्या फॅशन शोमध्ये प्रथम क्रमांक मिळवले होते. तसेच पनवेल येथील 'आयएनआयएफडि' यांच्या वार्षिक, उच्च श्रेणीच्या फॅशन शो ' सोल सेन्सेशण ३.०' मध्ये शो स्टॉपर म्हणून वॉक केलेला आहे. नवी मुबईतील 'मिस मेस्मेरिक क्वीन इंडिया २०२१' यामध्ये ' मिस स्पेक्टाक्यूलर आईज ' हे उपशीर्षक प्राप्त केले. त्याचप्रमाणे पुणे येथील पार पडलेल्या ‘मिस स्यायलिंग स्टार इंडिया २०२२' या प्रतियोगितेत प्रथम क्रमांक पटकावत 'मिस परफेक्ट बॉडी ' हे उपशीर्षकही प्राप्त केले. अलीकडेच कुमार सानू यांनी गायलेल्या व शेमरूच्या चॅनेल वरील तेरी यादे या मुझिक अल्बम मध्ये ती मॉडेल म्हणून प्रसिद्धीस आली होती. 






फोटो : उन्नती विलास साळवी
Comments
Popular posts
पनवेल जवळील पाच पीर डोंगर येथे ट्रेकींगसाठी जावून भरकटलेल्या ८ पर्यटकांना पनवेल शहर पोलिस व स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने केले रेस्क्यु..
Image
दुबईतुन गुंतवणुकीचे खोटे आमिष देणाऱ्या टोळीतील एका आरोपीस "सायबर सेल" पनवेल यांनी शिताफीने केले जेरबंद ..
Image
पनवेल शहर परिसरातील चर्चमधील चोरीचे गुन्हे उघडकीस ; पनवेल शहर पोलिसांची धडक कारवाई..
Image
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले बाळासाहेब ठाकरे राज्यस्तरीय फिल्म फेस्टिवलच्या पोस्टरचे अनावरण..
Image
शेतकऱ्यांना सरसकट कर्ज माफी मिळण्यासाठी पनवेल शहर जिल्हा कॉंग्रेसतर्फे आंदोलन..
Image