पुज्य सिंधी पंचायत ट्रस्ट, झुलेलाल मंदिर यांच्या वतीने झुलेलाल जयंती व चेट्रीचंड्र उत्सव साजरा..
झुलेलाल जयंती व चेट्रीचंड्र उत्सव साजरा..

पनवेल / दि.२३ (संजय कदम) : पुज्य सिंधी पंचायत ट्रस्ट, झुलेलाल मंदिर यांच्या वतीने सिंधी समाजाचे‎ इष्टदेवता झुलेलाल साई यांची जयंती व चेट्रीचंड्र उत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्त पनवेल शहरातून काढण्यात आलेल्या शोभायात्रेत सिंधी समाज बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
               पनवेल शहरातील विश्राळी नाका येथील सिंधी पंचायत हॉल शेजारील झुलेलाल मंदिरात दिवसभर धार्मिक कार्यक्रम साजरे करण्यात येणार असल्याची माहिती ऍड मनोहर सचदेव यांनी दिली. यामध्ये बहेराना साहेबची पूजा, सांस्कृतिक कार्यक्रम, भंडारा प्रसाद आदी कार्यक्रमांना समाजबांधवांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यानिमित्त आमदार प्रशांत ठाकूर यांनी या कार्यक्रमाला भेट देत झुलेलाल साई यांचे दर्शन घेतले व सिंधी बांधवांना झुलेलाल जयंतीच्या शुभेच्छा दिल्या. तसेच जयंतीनिमित्त सिंधी समाज बांधवांतर्फे छत्रपती शिवाजी महाराज चौक ते विश्राळी नाका पर्यंत शोभायात्रा काढण्यात आली. या शोभायात्रेत ऍड मनोहर सचदेव, अशोक जेसवानी, हितेश ग्वालानी, महेश चेतवानी, आनंद सचदेव, चंदर देवानी, अनिल फुलवानी, विशाल नागरानी, दौलत सचदेव, रमेश सचदेव, राजू सचदेव यांच्यासह महिलावर्ग व सिंधी समाज बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.




फोटो : झुलेलाल जयंती
Comments