पनवेलमध्ये प्रथमच मोफत मोतीबिंदू परीक्षण महाशिबीर...
पनवेलमध्ये मोफत मोतीबिंदू परीक्षण महाशिबीर...

पनवेल /दि.२१ (संजय कदम): रुधिरसेतू सेवा संस्था, राजस्थानी महिला मंडळ पनवेल आणि इंनरव्हिल क्लब ऑफ पनवेल सिटी ह्यांच्या संयुक्त विद्यमाने जैन स्थानक पनवेल येथे मोफत मोतीबिंदू परीक्षण शिबीर घेण्यात आले. रुधीरसेतुच्या नेत्रसेवा विभागाचे पहिलेच शिबीर म्हणून हे एक मोठे यश होते. या शिबिराचा एकूण 250 नागरिकांनी लाभ घेतला.
     या शिबिरात मोतीबिंदूसह व्हिजन चाचणी घेण्यात आली आणि ज्यांना त्याची आवश्यकता आहे त्यांच्यासाठी मोफत चष्मा वितरीत करण्यात आले. सर्व रुधीरसेतू व राजस्थानी महिला मंडळ, पनवेल कार्यकर्ता यांनी हे शिबीर यशस्वी करण्यासाठी प्रचंड परिश्रम घेतले. राजस्थानी महिला मंडळाच्या सुनंदा कोठारी, मनीषा बोरा, सौदी.धनश्री बांठिया, सौदी.पल्लवी मुनोथ, सुवर्णा भंडारी, इनरव्हील क्लब ऑफ पनवेल सिटीच्या कु.हेतल बालड आणि कु.गिरा चौहान तसेच रुधिरसेतू सेवा संस्थेच्या सुरेश रिसबुड, डॉ.नरेंद्रकुमार दसरे, सचिन भिसे, मुरलीधर ढाके, अमोल साखरे ह्या सर्वानीच पनवेलमधील जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी हे गेल्या १५ दिवसांपासून प्रयत्न केले. रुधिरसेतू सेवा संस्थेचे संस्थापक उन्मेष लोहार ह्यांनी संपूर्ण रुधीरसेतू आणि राजस्थानी महिला मंडळ पनवेल परिवाराच्या वतीने सर्व स्वयंसेवकांचे, हितचिंतकांचे, ज्यांनी या उपक्रमाला पाठिंबा दिला अश्या सर्वांचेच आभार मानले तसेच अश्या प्रकारची शिबिरे संपूर्ण महाराष्ट्रात घेण्याचा संकल्प देखील जाहीर केला.







फोटो: मोतीबिंदू परीक्षण महाशिबीर
Comments
Popular posts
देशाचे पुढचे राजकारण आपल्या मनासारखे होण्यासाठी इंडियाने एकरूप होऊन काम करावे लागेल - शिवसेना नेते मा.खासदार अनंत गीते..
Image
बांगलादेश मधील खुनाच्या गुन्ह्यातील आरोपींना पनवेल शहर पोलिसांकडून अटक...
Image
को.ए.सो. इंदुबाई अ.वाजेकर आणि के.वी.कन्या विद्यालय शाळा समितीच्या चेअरमनपदी प्रितम म्हात्रे यांची निवड..
Image
नैना हटाव शेतकरी बचाव अंतर्गत सिडकोविरोधातील शेतकऱ्यांच्या आमरण उपोषणाला शिवसेनेचा(उद्धव बाळासाहेब ठाकरे) सक्रिय पाठिंबा..
Image
बाबासाहेब लिगल पँथर संघटनेच्या नेतृत्वात पनवेलमध्‍ये प्रथमच भव्य संविधान सम्मान शोभायात्रा(मिरवणुक)संपन्न...
Image