पनवेल येथील बाळासाहेब ठाकरे लॉ कॉलेजची येरवडा तुरुंगात शैक्षणिक सहल...
पनवेल येथील बाळासाहेब ठाकरे लॉ कॉलेजची येरवडा तुरुंगात शैक्षणिक सहल...

पनवेल दि.२५ (संजय कदम) : पनवेल येथील कमलगौरी हिरू पाटील संस्था अंतर्गत बाळासाहेब ठाकरे लॉ कॉलेजने संस्थेचे चेअरमन बबनदादा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली येरवडा कारागृह पुणे येथे प्रात्यक्षिक अभ्यासक्रमाचा भाग म्हणुन भेट दिली. यावेळी विद्यार्थ्यांनीं तेथील महिला व बाल विकास मंडळ, सुधार कारागृह, खुला येथील कैदी व तेथील विविध व्यवस्थापनाचा अभ्यास केला. 
                   कॉलेजचे प्राचार्य राठोड, उप प्राचार्य कांबळे, प्रा. प्राजक्ता औटी, प्रा. पुजा चव्हाण, प्रा. प्रिजा भोईर व अमित सूर्यवंशी, विकेश पवार व महिला व बालकल्याण समिती अधिक्षक दत्तात्रय कुटे यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनीं येरवडा कारागृह पुणे येथे प्रात्यक्षिक अभ्यासक्रमाचा भाग म्हणुन भेट दिली. येरवडा खुले कारागृह हे याच परिसरात आहे. जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आलेल्या ज्या कैद्यांनी पाच वर्षे पुर्ण केली आहे आणि या काळात चांगले वर्तन केले आहे त्या कैद्यांनी खुल्या कारागृहात ठेवतात. येथे मूलभूत सुरक्षा असतात आणि त्यांना कारागृहाच्या खोल्यांमध्ये ठेवले जात नाही. यानंतर महिला कारागृहास भेट दिली. येथील महिला व पुरुष तेथील शेती करतात. तेथे आलेल्या भाज्या तिथेच वापरल्या जातात. शिक्षा संपत आलेल्या कैद्यांनी व्यवसायिक शिक्षण दिले जाते. बाहेर आल्यावर त्यांना उदरनिर्वाह चालवता यावा अशी अपेक्षा असते. तेथील महिला कॉटन साडी बनवणे, अगरबत्ती बनवणे आसे लघु उद्योग ही करतात. अभ्यासाचा भाग म्हणुन अजून काही व्यवस्थपनामध्ये बदल होण्यासाठी विद्यार्थी नक्की प्रयत्न करतील याचा फायदा कैदी व सरकारलाही होईल अशी अपेक्षा उपस्थित प्राचार्यांनी व्यक्त केली 





फोटो : बाळासाहेब ठाकरे लॉ कॉलेजची येरवडा तुरुंगात शैक्षणिक सहल
Comments
Popular posts
देशाचे पुढचे राजकारण आपल्या मनासारखे होण्यासाठी इंडियाने एकरूप होऊन काम करावे लागेल - शिवसेना नेते मा.खासदार अनंत गीते..
Image
नैना हटाव शेतकरी बचाव अंतर्गत सिडकोविरोधातील शेतकऱ्यांच्या आमरण उपोषणाला शिवसेनेचा(उद्धव बाळासाहेब ठाकरे) सक्रिय पाठिंबा..
Image
बाबासाहेब लिगल पँथर संघटनेच्या नेतृत्वात पनवेलमध्‍ये प्रथमच भव्य संविधान सम्मान शोभायात्रा(मिरवणुक)संपन्न...
Image
१५ वर्षीय मुलाला कायदेशीर रखवालीतून नेेले पळवून...
Image
तुरमाळे येथील नैना विरोधातील आमरण उपोषणास भेट देत शिवसेना नेते मा.खासदार अनंत गीते यांनी दिला पाठींबा...
Image