चाकूचा धाक दाखवून पादचाऱ्यास लुटणाऱ्या त्रिकुटास पनवेल शहर पोलिसांनी केले गजाआड ..
त्रिकुटास पनवेल शहर पोलिसांनी केले गजाआड.. 

पनवेल वैभव / दि.०३ (संजय कदम):  एका इसमाला ती अज्ञातांनी चाकूचा धाक दाखवून त्याच्याकडून ९ हजार ६०० रुपयांची रोख रक्कम आणि मोबाईल चोरून नेल्याची घटना पनवेल शहर परिसरात घडली होती. या प्रकरणी शहर पोलिसांनी तीन आरोपींना अवघ्या १ तासात अटक केली आहे.

फिर्यादी बजरंग पवार (वय २२) हा पनवेल रेल्वे स्टेशन रोडवरून डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याकडून पायी जात असताना आरोपी साहील धोत्रे, प्रथम जाधव, डेविड जोसेफ या त्रिकुटाने आपसात संगणमत करुन त्याला हाताबुक्याने मरहाण करुन त्याच्या गळयाला चाकु लावुन, त्याचा हात धरुन ठेवुन खिश्यातील ९ हजार ६०० रुपये आणि मोबाईल जबरी चोरी करून ते पसार झाले होते. याबाबत त्याने पनवेल शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय कादबाने यांच्या मार्गदर्शनाखाली पोउपनि अभयसिंह शिंदे, पोहवा रविंद्र राऊत, पोहवा परेश म्हात्रे, पोहवा महेंद्र वायकर, पोना रविंद्र पारधी, पोना विनोद देशमुख, पोशि प्रसाद घरत यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेवुन गुप्त बातमीदार व तांत्रिक तपासद्वारे अवघ्या १ तासात तीनही आरोपींना गुन्ह्यातील मुद्देमालासह ताब्यात घेते आहे.
Comments
Popular posts
पर्यावरण पूरक गणेश उत्सव ; हाच खरा गणेश उत्सव - सुप्रसिद्ध डॉ.गिरीश गुणे
Image
पनवेल शहर जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेस कार्यकारिणी जाहीर ; महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी युवक काँग्रेस अध्यक्ष महेबूब शेख यांची प्रमुख उपस्थिती
Image
शिवसेनेच्या आवाहनानंतर पोलीस व एमएसईबी अधिकाऱ्यांनी केलेल्या आवश्यक बाबींच्या पूर्ततेमुळे विसर्जन सुरळीत ...
Image
रायगड जिल्हा परिषदेच्या उर्दू शाळेत दप्तरवीना शाळा उपक्रम संपन्न...
Image
मनिषा घाडगे -खांडे यांची आध्यात्मिक छाप ; प्रवचन कीर्तन प्रशिक्षण 'अ' श्रेणी प्राप्त करून पूर्ण..
Image