भंगार माफियांच्या टायरसह इतर वस्तू जाळण्याच्या प्रकारामुळे साईनगरवासियांचे आरोग्य धोक्यात...
 साईनगरवासियांचे आरोग्य धोक्यात...
पनवेल दि.१९ (संजय कदम) : पनवेल शहरातील कळंबोली-जेएनपीटी मार्गावर असलेल्या भंगार माफियांमुळे टायरसह इतर वस्तू जाळण्याच्या प्रकारामुळे साईनगरवासियांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
कळंबोली-जेएनपीटी मार्गावर असलेल्या महावीर वाटिका इमारतीच्या समोरील भंगार व्यावसायिक टायरमधील तारा गोळा करण्याच्या नादात मोठ्या प्रमाणात टायर रात्रीच्या सुमारास जाळत आहेत. त्यामुळे या परिसरात अतिशय घाणेरडा वास पसरत असून मोठ्या प्रमाणात प्रदुषण निर्माण होत आहे. दरम्यान शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास या भंगार व्यावसायिकाने लावलेल्या आगीमुळे परिसरात आग पसरली होती. नागरिकांनी याची माहिती पनवेल शहर पोलीस व अग्निशमन दलाला दिल्यांनतर त्याठिकाणी तात्काळ दाखल होत हि आग विझवली. या भंगारमाफियानांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी येथील नागरिकांनी पनवेल शहर पोलिसांकडे केली आहे.

फोटो : साईनगर परिसरात लागलेली आग
Comments