शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नविन पनवेल शहर आयोजित ‘होममिनिस्टर’ ला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद ..
‘होममिनिस्टर’ ला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद ..

पनवेल / दि.१४ (संजय कदम) : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नविन पनवेल शहर यांच्या वतीने शिवजयंती निमित्त महिलांसाठी खास हळदीकुंकूनिमित्त ‘होममिनिस्टर’ कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.   
महिलांना हसत खेळत आपल्यातल्या कलागुण कौशल्याला वाव मिळावा यासाठी शिवसेना नविन पनवेल शहर प्रमुख यतिन देशमुख व शहर संघटिका अपूर्वा प्रभू यांच्या वतीने शिवजयंती निमित्त महिलांसाठी हळदीकुंकूनिमित्त ‘होममिनिस्टर’ कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. 
या कार्यक्रमाला जिल्हासंपर्क प्रमुख बबन पाटील, जिल्हाप्रमुख शिरीष घरत, वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुभाष कोकाटे, उपजिल्हा प्रमुख भरत पाटील, विधानसभा संघटक दिपक निकम, महानगर संघटक दिपक घरत, पनवेल शहरप्रमुख प्रवीण जाधव, माजी शहरप्रमुख विजय शेट्ये, उपशहर प्रमुख अजय गोयाजी, ज्ञानेश्वर भंडारी, महिला विधानसभा संघटिका रेवती सकपाळ, सुगंधा शिंदे, संगीता राऊत, अर्चना कुळकर्णी, विभाग प्रमुख बिपिन झुरे, उपविभाग प्रमुख राजेश वैगणकर, अविनाश गव्हाणकर, संजय भोसले, शाखाप्रमुख शाम खडकबाण, वसंत सोनावणे, जयेश पाटील, वैशाली थळी, तनुजा झुरे, सेजल खडकबाण, अलका सानप, अर्चना पाटील हे उपस्थित होते. 
यामध्ये महिलांना भरघोस बक्षिसे सोबत लकी ड्रॉ मध्ये पैठणी जिंकण्याची सुवर्ण संधी ठेवण्यात आली होती. तसेच भाग्यवान महिलांना सोन्याची नथ चे पहिले पारितोषिक तसेच दुसरे पारितोषिक एल.सी.डी. टिव्ही तर तिसरे पारितोषिक कूलर भेट म्हणून देण्यात आले. तसेच कार्यक्रमात सहभागी होणाऱ्या प्रत्येक महिलेस आकर्षक बक्षिस देण्यात आले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नितिन घाणेकर यांनी केले. या कार्यक्रमासाठी किरण तावदारे, मालती पिंगळा आणि किरण सोनावने यांचे सहकार्य लाभले. 







फोटो : पैठणी देताना शिवसेनेचे पदाधिकारी
Comments