पनवेलमध्ये अवैध मद्यसाठा वाहतूक करणाऱ्या ट्रकसह दीड कोटींचा मुद्देमाल जप्त..
 दीड कोटींचा मुद्देमाल जप्त....

पनवेल दि. ०१ (वार्ताहर) : गोवा राज्यात निर्मित व विक्रीसाठी असलेले विविध ब्रॅण्डच्या विदेशी मद्याचे अवैध वाहतूक करणाऱ्या ट्रकला राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिका-यांनी सापळा रचून १३१० खोके अवैध मद्यसाठा जप्त करण्यात आला. संबंधित आरोपींकडून मिळालेल्या माहितीनंतर हा मद्यसाठा ज्या गोदामात ठेवला जातो तेथे धाड टाकल्यावर अजून ७०९ खोके मद्याच्या बाटल्या भरलेले सापडले. या सर्व मद्याची किंमत सूमारे दीड कोटी रुपये आहे.
                        
गोवा राज्यात निर्मित मद्यसाठ्याची अवैधपणे वाहतूक सूरु असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त विजय सूर्यवंशी यांच्या पथकाला मिळाली होती. त्यानुसार राज्य उत्पादन शुल्क विभागाचे भरारी पथकाचे निरिक्षक संताजी लाड, मनोज चव्हाण, दुय्यम निबंधक योगेश फटांगरे, शहाजी गायकवाड यांच्या पथकाने गोवा मुंबई महामार्गावर पनवेल तालुक्यातील शिरढोण गावाजवळ सापळा रचला. ट्रक क्रमांक एमएच ०४ ईव्हाय १९४९ या संशयीत ट्रकला रोखून त्याची तपासणी केल्यावर या ट्रकमध्ये सिमेंटच्या विटा त्याखाली लपवलेले १ कोटी ०३ लाख ९८ हजार २०० रुपये किंमतीचे १३१० खोके मद्यसाठा जप्त करुन तीन आरोपींना अटक करण्यात आली. त्यानंतर आरोपींनी दिलेल्या माहितीनुसार शिवलखन मोतीलाल केवट यास बामन डोंगरी परिसरातून ताब्यात घेतले. त्याची अधिक चौकशी केली असता त्याने ही दारु मुंबईत आणून एका गोडाऊन मध्ये ठेवून नंतर मुंबईतील विविध हॉटेलमध्ये ती पुरवठा केली जात असल्याची माहिती दिली. त्यानुसार राज्य उत्पादन शुल्क विभागाने गोडावून नं. ९, प्लॉट नं. १२९०, केडब्लयुसी नोड, खिडूकपाडा येथे छापा घालून सदर गोडावून मधून गोवा राज्यात निर्मित व विक्रीसाठी असलेले विदेशी मद्याचे ७०९ बॉक्स असा एकूण रु. ५१ लाख १२ हजार ८०० रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करुन शिवलखन मोतीलाल केवट यास सदर गुन्हयात अटक केली. या गुन्ह्यात अद्यापपर्यंत १ कोटी ५४ लाख ३१ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. 
फोटो - अवैध मद्यसाठा
Comments
Popular posts
पनवेल जवळील पाच पीर डोंगर येथे ट्रेकींगसाठी जावून भरकटलेल्या ८ पर्यटकांना पनवेल शहर पोलिस व स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने केले रेस्क्यु..
Image
दुबईतुन गुंतवणुकीचे खोटे आमिष देणाऱ्या टोळीतील एका आरोपीस "सायबर सेल" पनवेल यांनी शिताफीने केले जेरबंद ..
Image
पनवेल शहर परिसरातील चर्चमधील चोरीचे गुन्हे उघडकीस ; पनवेल शहर पोलिसांची धडक कारवाई..
Image
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले बाळासाहेब ठाकरे राज्यस्तरीय फिल्म फेस्टिवलच्या पोस्टरचे अनावरण..
Image
शेतकऱ्यांना सरसकट कर्ज माफी मिळण्यासाठी पनवेल शहर जिल्हा कॉंग्रेसतर्फे आंदोलन..
Image