पनवेल महापालिकेच्या आगामी निवडणुकीत शिवसेनेला अपेक्षित यश मिळेल - शिवसेना रायगड जिल्हा संपर्क प्रमुख रामदास शेवाळे..
शिवसेना रायगड जिल्हा संपर्क प्रमुख रामदास शेवाळे..
पनवेल दि.१२ (संजय कदम): खारघर येथे शिवसेनेचे जनसंपर्क कार्यालय सुरु झाले आहे. या कार्यालयाचे शिवसेनेचे रायगड जिल्हा संपर्क प्रमुख रामदास शेवाळे यांच्याहस्ते उदघाटन झाले. यावेळी त्यांनी आगामी निवडणुकीत शिवसेनेला अपेक्षित यश मिळेल असा विश्वास व्यक्त केला. यावेळी नवनिर्वाचित शिक्षक मतदार संघाचे आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे सर यांची प्रमुख उपस्थिती लाभली.  

               खारघर मधील जनतेचे प्रश्न सोडवण्याच्या दृष्टीकोनातून शिवसेनेचे महानगर संघटक मंगेश रानवडे आणि खारघर शहर संघटक कळंबोली इम्तियाज शेख यांनी शिवसेना जनसंपर्क कार्यालय सुरु केले आहे. या कार्यालयाचे शिवसेनेचे रायगड जिल्हा संपर्क प्रमुख रामदास शेवाळे यांच्याहस्ते उदघाटन झाले. यावेळी शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे सर यांची प्रमुख उपास्थित होती. या कार्यालयामुळे खारघर शहरातील सर्वसामान्य जनतेच्या सर्व अडी अडचणी सोडवण्यात मदत होणार आहे. याप्रसंगी शिवसेना उपजिल्हा प्रमुख परेश पाटील, महानगर प्रमुख प्रथमेश सोमण, कळंबोली शहर प्रमुख तुकाराम सरक, खोपोली विभाग संपर्क प्रमुख विजय पाटील, मा. नगरसेवक हरेश केणी तसेच इतर मान्यवर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.




फोटो: शिवसेना जनसंपर्क कार्यालय उदघाटन
Comments
Popular posts
बोलघेवड्या योजनांचा भांडाफोड प्रत्यके शिवसैनिकांनी घराघरात जाऊन केला पाहिजे- पुणे संपर्क प्रमुख व आ.सचिन अहिर
Image
पर्यावरण पूरक गणेश उत्सव ; हाच खरा गणेश उत्सव - सुप्रसिद्ध डॉ.गिरीश गुणे
Image
पनवेल शहर जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेस कार्यकारिणी जाहीर ; महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी युवक काँग्रेस अध्यक्ष महेबूब शेख यांची प्रमुख उपस्थिती
Image
रोटरी क्लब ऑफ पनवेल सेंट्रलतर्फे "सेवाश्री" पुरस्काराने प्रितम म्हात्रे सन्मानित..
Image
केदार भगत मित्र परिवार यांच्या "गणपती आरती संग्रह पुस्तकाचे मा.खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्याहस्ते प्रकाशन...
Image