वयोवृध्दांना लुबाडणा-या सराईत गुन्हेगारांना गुन्हे शाखा कक्ष ०२ कडुन अटक ; ५ लाख ३० हजारांचे सोन्याचे दागिने केले जप्त...
५ लाख ३० हजारांचे सोन्याचे दागिने केले जप्त...
पनवेल / दि.११ (संजय कदम) : वयोवृध्द नागरीकांना अचानक रस्त्यात अडवून त्यांना बोलण्यात गुंतवूण हातचलाखीने त्यांचे कडील सोन्याचे दागिणे फसवूण नेणाऱ्या दोघा सराईत गुन्हेगारांना गुन्हे शाखा कक्ष ०२ ने अटक केली आहे. त्यांच्याकडून पोलिसांनी ५ लाख ३० हजारांचे सोन्याचे दागिने जप्त केले आहे.
  आरोपी हे वयोवृध्द नागरीकांना एकटे हेरून लुटत असल्याने सदरचे गुन्हे उघडकीस आणने पोलीसांना अतिशय आव्हानात्मक होते. त्या अनुषंगाने गुन्हे शाखा कक्ष २ पनवेलचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रविंद्र पाटील यांच्या नेतृत्वाखाली सपोनि संदिप गायकवाड, प्रविण फडतरे, पोलिस उप निरीक्षक वैभव रोंगे, मानसिंग पाटील, पो. हवा. प्रशांत काटकर, दिपक डोंगरे, रणजित पाटील, सचिन पवार, अनिल पाटील, मधुकर गडगे, तुकाराम सुर्यवंशी, अजित पाटील, जगदिश तांडेल, ज्ञानेश्वर वाघ, इंद्रजित कानु, रूपेश पाटील, निलेश पाटील, राहुल पवार, सागर रसाळ, पो.ना. अजिनाथ फुंदे, प्रफुल मोरे, नंदकुमार ढगे, अभय मेन्या, पो.शि. संजय पाटील, विक्रांत माळी आदींच्या पथकाने घडलेल्या गुन्हयांचे घटनास्थळी जावून फिर्यादी-साक्षीदार यांना भेटून त्यांच्याकडून आरोपीची संभाषणाची भाषा, बोलण्याची पध्दत, पेहराव, शरीरयष्टी इत्यादीबाबत सखोल माहिती घेतली. त्याचप्रकारे तांत्रिक तपास आणि गुप्त बातमीदाराच्या सहाय्याने अश्या प्रकारचे गुन्हे करणारी आरोपीची टोळी सक्रिय झाली असल्याची खात्री केली. त्यानुसार पथकाने गुन्हा घडल्याची वेळ, घटनास्थळी आरोपी येण्याजाण्याचा मार्गावरील सुमारे ६९ ठिकाणांचे सीसीटिव्ही फुटेजची तपासणी करून आरोपी नरेश विजयकुमार जयस्वाल (वय ४२, रा. शिळगाव), बाबु इराप्पा मणचेकर (वय ६०, रा. तळोजा) यांना अटक करून त्यांच्याकडून ५ लाख ३० हजार रुपये किंमतीचे सोन्याचे दागिणे जप्त केले आहे.
Comments