शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांच्या वतीने उद्योजकांना मदतीचा हात...
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांच्या वतीने उद्योजकांना मदतीचा हात....

पनवेल वैभव / दि.०८(संजय कदम):  शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांच्या वतीने उद्योजकांना मदतीचा हात खारघर येथे देण्यात आला आहे.
      शिवसेना पक्ष प्रमुख तथा महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे व तत्कालीन महाविकास आघाडी सरकारने मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेअंतर्गत फिरते विक्री केंद्र योजनेतून बेरोजगारांना स्वंयरोजगाराची संधी उपलब्ध करून देण्याच्या अनुषंगाने माझा व्यवसाय, माझा हक्क अशी योजना राबविण्यात आली होती.  
या योजने अंतर्गत शिवसेना जिल्हाप्रमुख रायगड शिरीष घरत यांच्या माध्यमातून खारघर सेक्टर-11 येथील या योजनेचे लाभार्थी महादेव वनवे यांच्या नावे नवीन वडापाव विक्रीचा व्यवसाय सुरू करण्यात आला. या गाडीचे उद्दघाटन शिवसेना जिल्हाप्रमुख रायगड शिरीष घरत यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ह्रुदयात राम आणि हाताला काम देणार आमचं हिंदूत्व असल्याचे शिरीष घरत यानी सांगितले. यावेळी शिवसेना महानगर समन्वयक दिपक घरत, उपमहानगर प्रमुख प्रकाश गायकवाड, उपमहानगर समन्वयक संजय शिंदे, शहर प्रमूख गुरुनाथ पाटील, उपशहर संघटक विद्या घुंघरावळ, उपशहरप्रमुख प्रशांत जांभूळकर, विभाग प्रमुख अनिल तळवणेकर, विभाग समन्वयक संजय कानडे, शाखा प्रमुख आनंद व्हावळ आदि पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

फोटो : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांच्या वतीने उद्योजकांना मदतीचा हात
Comments
Popular posts
जम्मू काश्मीर आणि मोझांबिक मेगा सर्जिकल कॅम्पवीरांचा सन्मान...
Image
राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या धडक कारवाईत १ कोटी रूपये किमंतीच्या गांजासह वाहन हस्तगत ; दोन आरोपी ताब्यात..
Image
पनवेल तालुका विधी सेवा समिती व वकील संघटना पनवेल यांच्या संयुक्त विद्यमाने वृक्षारोपण..
Image
तळोजा भागातुन ७ महिन्याच्या बाळाचे अपहरण ; पोलिसांकडुन अपहरणकर्त्याचा शोध सुरु..
Image
नवी मुंबई विमानतळाला लोकनेते दि.बा.पाटील यांचे नाव देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे पत्राद्वारे पाठपुरावा करणार - सर्व पक्षीय कृती समितिचा निर्धार
Image