शिवसेना (उद्घव बाळासाहेब ठाकरे) पक्षात मनसे पदाधिकाऱ्यांनी केला जाहीर पक्ष प्रवेश....
शिवसेना (उद्घव बाळासाहेब ठाकरे) पक्षात मनसे पदाधिकाऱ्यांनी केला जाहीर पक्ष प्रवेश....

पनवेल / दि.१०(वार्ताहर): शिवसेना शिवसेना (उद्घव बाळासाहेब ठाकरे) पक्षात मुंबई येथून खारघर परिसरात वास्तव्यास आलेल्या मनसेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी शिवसेनेचा भगवा ध्वज हाती घेत शिवबंधन हाती बांधले आहे. 

   शिवसेना जिल्हा प्रमुख शिरीष घरत यांच्या मार्गदर्शनाखाली मनसे शाखाध्यक्ष शाखा क्रमांक 202 चे शैलेश गायकवाड यांच्यासह इतर पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी शिवसेना (उद्घव बाळासाहेब ठाकरे) पक्षात जाहीर पक्ष प्रवेश केला आहे. यावेळी शिवसेना विधानसभा समन्वयक प्रदीप ठाकूर, खारघर शहर प्रमुख गुरुनाथ पाटील यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते.
फोटो: पक्ष प्रवेश
Comments