अभिनेते सयाजी शिंदे आणि प्रितम म्हात्रे यांच्या हस्ते माधवबाग नवीन पनवेल शाखेचा शुभारंभ..
माधवबाग नवीन पनवेल शाखेचा शुभारंभ..

पनवेल / दि.१०(वार्ताहर): माधवबाग ही हृदयरोगावर विनाशस्त्रक्रिया उपचार करणारी भारतातील अग्रगण्य वैद्यकीय संस्था आहे. सुमारे ५ दशके लाखो हृदयरूग्णांवर यशस्वी उपचार करत आहे. माधवबाग चे जाळे संपूर्ण देशात पसरले आहे. पूर्वी माधवबाग मध्ये उपचार करून घेण्यासाठी रुग्णांना नवीन पनवेल बाहेर जावे लागत असे परंतु आता नवीन पनवेल करांच्या सेवेमध्ये सौ.शिल्पा सचिन चंदने आणि डॉ.सुनिता पाटील  यांच्या माध्यमातून सिनेराज टॉकीजच्या समोर आणि नायर आय केअर हॉस्पिटलच्या शेजारी नवीन पनवेल येथे माधवबाग नवीन पनवेल शाखेचे दिमागदार उद्घाटन समारंभ अभिनेते सयाजी शिंदे आणि पमपा विरोधी पक्षनेते प्रितम जनार्दन म्हात्रे यांच्या शुभहस्ते पार पडला.

     यावेळी नागरिकांसोबतच माधवबाग केंद्रामध्ये उपचार घेणाऱ्या रुग्णांचा प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते एक छोटे रोपटे देऊन या सर्वांचे विशेष आभार मानण्यात आले. यावेळी नवीन पनवेलकरांसाठी त्यांच्या हृदयाची काळजी घेण्यासाठी भविष्यात उद्भवणाऱ्या हृदय रोगावर विना शस्त्रक्रिया उपचार करण्यासाठी आम्ही रुग्णांना प्रोत्साहित करणार आहोत जेणेकरून हार्ट अटॅक येण्याचे प्रमाण जे सध्या वाढत आहे ते आटोक्यात आणण्यासाठी आमच्या माधवबाग नवीन पनवेल तर्फे रुग्णांना योग्य ती सेवा मिळेल असे शिल्पा सचिन चंदने आणि डॉ.सुनिता पाटील यांनी सांगितले. 






फोटो: माधवबाग शाखेचा शुभारंभ

--
Comments
Popular posts
बोलघेवड्या योजनांचा भांडाफोड प्रत्यके शिवसैनिकांनी घराघरात जाऊन केला पाहिजे- पुणे संपर्क प्रमुख व आ.सचिन अहिर
Image
पर्यावरण पूरक गणेश उत्सव ; हाच खरा गणेश उत्सव - सुप्रसिद्ध डॉ.गिरीश गुणे
Image
पनवेल शहर जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेस कार्यकारिणी जाहीर ; महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी युवक काँग्रेस अध्यक्ष महेबूब शेख यांची प्रमुख उपस्थिती
Image
रोटरी क्लब ऑफ पनवेल सेंट्रलतर्फे "सेवाश्री" पुरस्काराने प्रितम म्हात्रे सन्मानित..
Image
केदार भगत मित्र परिवार यांच्या "गणपती आरती संग्रह पुस्तकाचे मा.खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्याहस्ते प्रकाशन...
Image