के व्ही कन्या शाळेच्या १९६६-६७ च्या एस एस सी बॅच च्या विद्यार्थिनींचे स्नेहसंमेलन पनवेल येथे सम्पन्न....
विद्यार्थिनींचे स्नेहसंमेलन पनवेल येथे सम्पन्न....

पनवेल / वार्ताहर  : - के व्ही कन्या शाळेच्या १९६६-६७ च्या SSC batch विद्यार्थिनींचे स्नेह मिलन जैन हॉल पनवेल येथे सम्पन्न झाले . सत्तरी पार केलेल्या सुमारे ४० जणींनी सहभाग घेतला . अमेरिकेत स्थायीक असलेल्या उज्ज्वला शेठ तसेच बैंगलोर, नाशिक, पुणे , ठाणे , डोंबिवली आदि विविध शहरांतून आलेल्यानी ७०/७५ नव्हे तर १७ वर्ष वयाच्या उत्साहाने सहभाग घेतला . सर्वांनी शाळेला भेट देऊन जून्या आठवणींना ऊजाळा दिला . सर्व शिक्षक वृंदाने यथोचित स्वागत केले . शकुंतला बांठीया , सुमन नातू, शकुंतला दिवटे, कुन्दा कुळकर्णी , सुलोचना घांग्रेकर, उज्ज्वला शेठ , पाटकर मैडम , अंजली भगत , प्रेमा सोहोनी , निर्मला मुनोथ, शैला गड़करी आणि अनेक जणिंनी आपले मनोगत व्यक्त केले . बालकलाकार  वृद्धी बांठीया हिने गाणी सादर करुन सर्वांची मने जिंकली . 

सर्वांना एकत्र आणुन हा कार्यक्रम सफल आणि अविस्मरणीय करण्यासाठी शकुंतला बांठीया यांनी ( मेहता, बंगलोर ) अथक मेहनत घेतली .  शालेय मैत्रीला वयाचे बंधन नसते याचे मूर्तिमंत उदाहरण असा हा स्नेह मिलनाचा सोहळा,
सकाळी ९ वाजता सुरू झालेला कार्यक्रम संध्याकाळी ६ वाजता संपला . जड़ अंत:करनाने सर्वानी एकमेकांचा निरोप घेतला .
Comments
Popular posts
पनवेल जवळील पाच पीर डोंगर येथे ट्रेकींगसाठी जावून भरकटलेल्या ८ पर्यटकांना पनवेल शहर पोलिस व स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने केले रेस्क्यु..
Image
दुबईतुन गुंतवणुकीचे खोटे आमिष देणाऱ्या टोळीतील एका आरोपीस "सायबर सेल" पनवेल यांनी शिताफीने केले जेरबंद ..
Image
पनवेल शहर परिसरातील चर्चमधील चोरीचे गुन्हे उघडकीस ; पनवेल शहर पोलिसांची धडक कारवाई..
Image
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले बाळासाहेब ठाकरे राज्यस्तरीय फिल्म फेस्टिवलच्या पोस्टरचे अनावरण..
Image
शेतकऱ्यांना सरसकट कर्ज माफी मिळण्यासाठी पनवेल शहर जिल्हा कॉंग्रेसतर्फे आंदोलन..
Image