कारची स्कुटीला धडक, महिला जखमी...
कारची स्कुटीला धडक, महिला जखमी...

पनवेल / वार्ताहर - : कारने स्कुटीला धडक दिलेल्या धडकेत पस्तीस वर्षीय महिला जखमी झाली आहे. कार चालकाविरोधात कळंबोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
        
सारिका सोमनाथ चव्हाण सेक्टर 10 इ, कळंबोली या एक्टिवा स्कूटर एम एच 46 एस 2350 ही घेऊन पनवेल येथे जाण्याकरता निघाल्या. त्या बँक ऑफ इंडियाच्या कळंबोली येथे आले असता काळ्या रंगाच्या कारने त्यांचे ऍक्टिवाला ठोकर दिली. यावेळी त्या खाली पडल्या. व त्यांना चक्कर आली. त्यांना बहिरे हॉस्पिटल, कळंबोली येथे दाखल करण्यात आले. त्यानंतर पुढील उपचाराकरता सुश्रुत हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आले. त्या जखमी झाल्या आहेत. अपघातानंतर कारचालक पळून गेला आहे.
Comments