उन्नती साळवी चा दुबई येथील 'एव्हीए इंटरनॅशनल फॅशन शो' स्पर्धेत प्रथम क्रमांक...
उन्नती साळवी चा दुबई येथील 'एव्हीए इंटरनॅशनल फॅशन शो' स्पर्धेत प्रथम क्रमांक...

पनवेल / दि.०८ (वार्ताहर): खारघर मधील २० वर्षीय मॉडेल उन्नती साळवी हिने दुबई येथे पार पडलेल्या 'एव्हीए इंटरनॅशनल फॅशन शो' स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळविल्याने तिचे सर्वत्र कौतुक होत आहे.
         दुबई येथील एव्हिए एन्टरटेनमेंट तर्फे नुकताच  'फॅशन शो' आयोजित करण्यात आला होता. या 'फॅशन शो' मध्ये उन्नती साळवी हिने सहभाग नोंदवून प्रथम क्रमांक प्राप्त केला आहे. पनवेल तालुका पोलीस ठाण्याचे अधिकारी विलास साळवी यांची ही कन्या असून, या पूर्वी उन्नती साळवी हिने पनवेल येथील 'आय. एन. आय. एफ. डी.' यांच्या वार्षिक, उच्च श्रेणीच्या फॅशन शो स्पर्धेत प्राविण्य मिळविले होते. तसेच पुणे येथील पार पडलेल्या मिस स्यायलिंग स्टार इंडिया - २०२२ या स्पर्धेत उन्नती साळवी हिने प्रथम क्रमांक पटकावला आहे. याशिवाय नवी मुबईतील 'मिस मेस्मेरिक क्वीन इंडिया - २०२१' मध्ये 'मिस स्पेक्टाक्यूलर आईज उपशीर्षक प्राप्त केले आहे. गायक कुमार सानू यांनी गायलेल्या शेमारुच्या उत्पादनाच्या 'तेरी यादे' या संगीत अल्बम मध्ये उन्नती साळवी हिने मॉडेल म्हणून काम केले आहे. उत्कृष्ट मॉडेल बरोबर एक चांगले सर्जन होण्याची महत्त्वाकांक्षा असलेली उन्नती साळवी खारघर येथील येरळा आयुर्वेदिक महाविद्यालयांत शिक्षण घेत असून, तिची आयुर्वेद मध्ये सर्जन होण्याची इच्छा आहे. दुबई मध्ये आयोजित करण्यात आलेल्या फॅशन शो मध्ये सहभाग घेण्यासाठी फॅशन डिझाईनर मंदार तांडेल यांनी उन्नती साळवी हिचे ड्रेस तयार केले होते.फोटो: उन्नती साळवी
Comments