तळोजे येथे अमली पदार्थांची विक्री करताना दोघांना अटक ; ३ लाख ३० हजाराचे अमली पदार्थ जप्त...
३ लाख ३० हजाराचे अमली पदार्थ जप्त..


पनवेल वैभव / दि.१८ (संजय कदम) : तळोजा फेज 1 येथील मेट्रो ब्रिज खाली अंमलीपदार्थात बाळगुन विक्री करताना दोन इसमांना तळोजे पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याच्याकडून ३ लाख ३० हजार रुपये किमतीचे अमली पदार्थ जप्त केले आहे. 
तळोजा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सोनवणे यांना काही इसम अमली पदार्थांची विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार वपोनि सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि विनया पारासुर, पोउपनि अनंत लांब, पोउपनि विजय यादव यांनी सापळा रचुन तळोजा फेज 1 येथील मेट्रो ब्रिज खालून आरोपी शमी आलम मोहमद नासिर खान (वय ४२), आणि मजहुल कलाम मलीथ्या (वय 39) यांना ताब्यात घेतले. त्यांच्या कडून तळोजा पोलिसांनी 2 लाख 30 हजार रुपये किमतीचे 257 ग्रॅम वजनाचे चरस, 1 लाख रुपये किमतीचे 50 ग्रॅम वजनाचे मेथँक्युलॉन सह इतर साहित्य असा एकूण  3 लाख 30 हजार शंभर रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी तळोजा पोलिसांनी आरोपींविरोधात एनडीपीएस कायदाअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
Comments
Popular posts
पनवेल शहर वाहतूक शाखेच्या तत्परतेमुळे अपघातग्रस्त तिघांना मिळाले तात्काळ उपचार...
Image
महात्मा फुले जनआरोग्य योजनेत आमूलाग्र बदलांचे संकेत ; आमदार प्रशांत ठाकूर यांच्या पाठपुराव्याला मोठे यश...
Image
समाजकार्यातील उल्लेखनीय योगदानाबद्दल कोमल मोहनिष भोईर यांना ''टॉप 30 इन्स्पायरिंग वुमन अवॉर्ड 2026'' प्रदान...
Image
पनवेलच्या सिद्धांत संजय कांबळे विद्यार्थ्याचे स्कॉटलंड सॉलिसिटर परीक्षेत घवघवीत यश...
Image
एक महिन्याच्या डोकेदुखीचे उलगडले दुर्मिळ कारण ; शस्त्रक्रिया टाळत ‘एपिड्युरल ब्लड पॅच’ प्रक्रियेने रुग्णावर यशस्वी उपचार
Image