कामोठे येथील पेट्रोल पंप सुरू करा ; शिवसेनेची (उद्धव बाळासाहेब ठाकरे) महापालिकेकडे मागणी...
 महापालिकेकडे मागणी...

पनवेल वैभव / दि.१७ (संजय कदम) : कामोठे येथील पेट्रोल पंपाचे काम पूर्ण होऊन फक्त महापालिकेने भोगवटा प्रमाणपत्र दिले नसल्याने पेट्रोल पंप सुरू झालेला नाही आहे. त्यामुळे महापालिकेने लवकरात लवकर भोगवटा प्रमाण पत्र द्यावे अशी मागणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे उपशहर प्रमुख कामोठे शहर सचिन मनोहर त्रिमुखे यांनी पनवेल महानगरपालिकेचे आयुक्त गणेश देशमुख यांची भेट घेऊन केली आहे.  
कामोठेतील नागरिकांसाठी इंडियन ऑइल कंपनीतर्फे पेट्रोल पंप सुरु करण्यात आले आहे. परंतु पनवेल महानगर पालिकाकडे भोगवटा प्रमाण पत्रासाठी वर्षभरापुर्वी अर्ज केला मात्र त्यांना अजून महापालिकेमार्फत भोगवटा प्रमाणपत्र देण्यात आलेले नसल्याने सदर पेट्रोलपंप अद्याप बंद अवस्थेत आहे. याचा नाहक त्रास येथील रहिवाश्यांना होत आहे. त्यांना पेट्रोल भरायला खारघर किंवा कळंबोलीला जावं लागत आहे. या नागरी समस्येबाबत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे कामोठे शहर प्रमुख राकेश गोवारी यांच्या मार्गदर्शनाखाली उपशहर प्रमुख सचिन त्रिमुखे, उप विभाग प्रमुख चंद्रशेखर बनसोडे, विभाग संघटक संजय जंगम, शाखा प्रमुख सुरेश मोरे, संतोष कचरे आदी पदाधिकाऱ्यांनी पनवेल महानगरपालिकेचे आयुक्त गणेश देशमुख यांची भेट घेऊन यासंदर्भात त्यांना निवेदन दिले. तसेच या नागरी प्रश्नावर वेळ पडल्यास रस्त्यावर उतरू असा इशारा दिला. यावेळी आयुक्त गणेश देशमुख यांनी नागरी प्रश्नाकडे त्वरित लक्ष घालून सर्व सामान्य नागरिकांसाठी कामोठे मधील पेट्रोल पंप लवकरात लवकर सुरु करून देऊ असे वचन दिले.फोटो : आयुक्त गणेश देशमुख यांना निवेदन देताना शिवसेनेचे पदाधिकारी
Comments
Popular posts
पनवेल जवळील पाच पीर डोंगर येथे ट्रेकींगसाठी जावून भरकटलेल्या ८ पर्यटकांना पनवेल शहर पोलिस व स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने केले रेस्क्यु..
Image
दुबईतुन गुंतवणुकीचे खोटे आमिष देणाऱ्या टोळीतील एका आरोपीस "सायबर सेल" पनवेल यांनी शिताफीने केले जेरबंद ..
Image
पनवेल शहर परिसरातील चर्चमधील चोरीचे गुन्हे उघडकीस ; पनवेल शहर पोलिसांची धडक कारवाई..
Image
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले बाळासाहेब ठाकरे राज्यस्तरीय फिल्म फेस्टिवलच्या पोस्टरचे अनावरण..
Image
शिवसेना(उद्धव बाळासाहेब ठाकरे)पक्षाच्या देवद शाखेतर्फे आषाढी एकादशी निमित्त भाविकांना तुळशी रोपांचे वाटप...
Image