अमली पदार्थ विक्रीसाठी बाळगणाऱ्या २ इसमांना पनवेल शहर पोलिसांनी केली अटक..
अमली पदार्थ विक्रीसाठी बाळगणाऱ्या २ इसमांना पनवेल शहर पोलिसांनी केली अटक
 
१ लाख ६१ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत 

पनवेल दि.२५ (वार्ताहर) : पनवेल रेल्वे स्टेशन रोडवरील साईबाबा मंदिरासमोरील भगत चाळ परिसरात अमली पदार्थ विक्रीसाठी बाळगणाऱ्या २ इसमांना पनवेल शहर पोलिसांनी अटक केली असून त्यांच्याकडून 1 लाख 61 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. 
 
आरोपी सागर जोसेफ (वय 25) आणि गणेश जोसेफ (वय 21) हे पनवेल रेल्वे स्टेशन रोडवरील साईबाबा मंदिरासमोरील भगत चाळ परिसरात अमली पदार्थ विक्रीसाठी बाळगत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली पनवेल शहर पोलीस ठाणे स.पो.नि. प्रविण फडतरे, पो.हवा. संदेश म्हात्रे, पो.हवा. अमोल पाटील, पो.ना. मिथुन भोसले, पो.शि. किरण कराड, पो.शि. सचिन कोर, पो. शि विशाल दुधे आदींच्या पथकाने त्यांना ताब्यात घेतले. 
पोलिसांनी त्यांच्याकडून 1 लाख 9 हजार 900 रुपये किंमतीचा 4.396 किलो वजनाचा गांजा, रोख रक्कम आणि आयफोन मोबाईल असा एकूण 1 लाख 61 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. 



फोटो : आरोपींसह पोलीस
Comments
Popular posts
कु.सायली शिर्केने ॲडव्होकेट पदवी प्राप्त केल्याबद्दल शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातर्फे करण्यात आला विशेष सत्कार..
Image
शिवसेनेच्या ६० व्या वर्धापनदिनानिमित्त पनवेल दगडी शाळा येथे वृक्षारोपण आणि विद्यार्थ्यांना छत्री व वह्या वाटप कार्यक्रम संपन्न...
Image
शालेय जीवनात यशस्वी होण्यासाठी अहोरात्र मेहनत घेणे गरजेचे - महापौर नितीन पाटील
Image
पनवेलला वैभव लाभायचे असेल तर अतिक्रमण पूर्व दक्षता कमिटी स्थापन करावी - शिवसेना सल्लागार रमेश गुडेकर...
Image
पनवेल येथे ECHS पॉलीक्लिनिक स्थापन करण्यासाठी माजी सैनिक संघटनांची मागणी...
Image