तालुका विधी सेवा समिती, पनवेल व पनवेल बार असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने, मराठी भाषा गौरव दिन मोठ्या उत्साहात साजरा....
मराठी भाषा गौरव दिन मोठ्या उत्साहात साजरा....
पनवेल / प्रतिनिधी : -  पनवेल तालुका विधी सेवा, समिती व पनवेल बार असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने मराठी भाषा दिन 2023 मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमास प्रमुख वक्ते म्हणून वीर वाजेकर फुंडे महाविद्यालय , उरण येथील मराठी विषयाचे प्राध्यापक मा.श्री.चिंतामण धिंदळे उपस्थित होते. मराठी भाषेचा गौरवशाली इतिहास, बोलीभाषांचे महत्त्व, अभिजात भाषेच्या दर्जा संदर्भात मराठी भाषेची सद्यस्थिती, अशा अनेक विविध पैलूंच्या अनुषंगाने त्यांनी विषयाची मांडणी केली.

 या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान मा. श्री.जयराज वडणे ( अध्यक्ष,तालुका विधी सेवा समिती, पनवेल तथा जिल्हा न्यायाधीश, पनवेल ) यांनी भूषविले. विचारपीठावरती न्यायालयातील सर्व न्यायाधीश महोदय उपस्थित होते. पनवेल बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲड. मनोज भुजबळ व इतर सर्व पदाधिकारी उपस्थित होते. वकील बंधू-भगिनींनी आणि कर्मचारी वर्गांने या कार्यक्रमाची शोभा वाढविली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि प्रस्तावना विधी स्वयंसेवक शैलेश कोंडसकर यांनी केली.
Comments
Popular posts
बोलघेवड्या योजनांचा भांडाफोड प्रत्यके शिवसैनिकांनी घराघरात जाऊन केला पाहिजे- पुणे संपर्क प्रमुख व आ.सचिन अहिर
Image
पर्यावरण पूरक गणेश उत्सव ; हाच खरा गणेश उत्सव - सुप्रसिद्ध डॉ.गिरीश गुणे
Image
पनवेल शहर जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेस कार्यकारिणी जाहीर ; महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी युवक काँग्रेस अध्यक्ष महेबूब शेख यांची प्रमुख उपस्थिती
Image
रोटरी क्लब ऑफ पनवेल सेंट्रलतर्फे "सेवाश्री" पुरस्काराने प्रितम म्हात्रे सन्मानित..
Image
केदार भगत मित्र परिवार यांच्या "गणपती आरती संग्रह पुस्तकाचे मा.खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्याहस्ते प्रकाशन...
Image