डॉ. प्रभाकर पटवर्धन यांच्या स्मृती दिनानिमित्त शरद पोंक्षे यांचे व्याख्यान...
 शरद पोंक्षे यांचे व्याख्यान.....

पनवेल वैभव  / दि.१८ (संजय कदम) : रा.स्व. संघ जनकल्याण समिती संचालित डॉ. प्रभाकर पटवर्धन स्मृती रुग्णालयाचा २५ वा वर्धापन दिन आणि डॉ. प्रभाकर पटवर्धन यांच्या २६ व्या स्मृती दिनानिमित्त ज्येष्ठ रंगकर्मी शरद पोंक्षे यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे. 
 मंगळवार २१ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ६.३० वा. पनवेल शहरातील विरुपाक्ष मंगल कार्यालय येथे ज्येष्ठ रंगकर्मी शरद पोंक्षे यांच्या ‘सावरकर विचार दर्शन’ या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. तरी जास्तीत जास्त नागरिकांनी या व्याख्यानाला उपस्थित राहावे असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
Comments