नवी मुंबई पोलीस मुख्यालयात बायोमेट्रिक हजेरी ; पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांच्या भूमिकेचे स्वागत...
पो.आयुक्त मिलिंद भारंबे यांच्या भूमिकेचे स्वागत..


पनवेल दि.०७ (वार्ताहर) : गेल्या तीन ते चार वर्षांमध्ये घडी विस्कटलेल्या नवी मुंबई पोलीस दलात नव्या पोलीस आयुक्तांनी शिस्त लावण्याचा एक प्रकारे शिस्त लावण्यास सुरुवात केली आहे. पोलीस मुख्यालयातील व्हीआयपी कर्मचाऱ्यांना त्यांनी चाप बसवला आहे. गेल्या दोन-तीन दिवसांपासून या ठिकाणी बायोमेट्रिक हजेरी ला सुरुवात करण्यात आली आहे. त्यामुळे चिरीमिरी देऊन पसार होणाऱ्या आणि घरीच राहणाऱ्या पोलीस अंमलदारांना आता ड्युटीवर हजर राहावे लागत आहे. या पारदर्शक निर्णयाचे प्रामाणिक काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी स्वागत केले आहे.

नवी मुंबई ,पनवेल आणि उरण चा नवी मुंबई पोलीस आयुक्तालयामध्ये समावेश आहे. या ठिकाणची लोकवस्ती मोठ्या प्रमाणात असून मुंबईचे हे प्रवेशद्वार आहे. राष्ट्रीय महामार्ग येथून जातात. त्याचबरोबर जेएनपीटी हे आंतरराष्ट्रीय बंदर नवी मुंबई पोलिसांच्या अधिपत्याखाली आहे. मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती, लोह पोलाद मार्केट त्याचबरोबर एमआयडीसी नव्याने उभारण्यात येत असणारे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ हे सुद्धा नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीमध्ये आहे. त्यामुळे गुन्हेगारीचे प्रमाण सुद्धा या परिसरात वाढलेले आहे. एकूण लोकसंख्या आणि त्या तुलनेत नवी मुंबई पोलीस दलाकडे मनुष्यबळ कमी आहे. मुख्यालयामध्ये सुमारे 900 कर्मचारी नियुक्तीवर आहेत.  वेगवेगळे बंदोबस्त त्याचबरोबर कैदी पार्टी, नियंत्रण कक्ष, वेगवेगळ्या प्रकारच्या गस्त, व्हीआयपी बंदोबस्त त्याचबरोबर एस्कॉर्टिंग याशिवाय स्ट्राइकिंग फोर्स आधी विविध कर्तव्य या कर्मचाऱ्यांनी बजावणे बंधनकारक आहे. मात्र गेल्या काही वर्षांपासून या ठिकाणी व्हीआयपी संस्कृती उदयाला आली. यापैकी अडीचशे ते तीनशे कागदावर ड्युटी करत होते. त्यांची हजेरी लावली जात होती मात्र प्रत्यक्षात ते कर्तव्यावर नव्हते. अर्थपूर्ण व्यवहारातून व्हीआयपी सिस्टीम अधिकच फोफावली होती. या अगोदर वरिष्ठांकडून सुद्धा यासाठी अलिखित सहमती होती. जे डी, आर पी आय, आणि इतर अधिकाऱ्यांच्या वरद हस्ताने हे सर्व काही सुरू होते. परंतु मिलिंद भारंबे यांनी आयुक्त पदाचा पदभार घेतल्यानंतर अशाप्रकारे व्हीआयपी कोट्यातून घरी राहणारे त्याचबरोबर इतर व्यवसाय आणि दुसऱ्या पोलीस ठाण्यांमध्ये वसुली करणाऱ्यांना चाप बसला आहे. हे सर्वजण गेल्या काही दिवसांपासून पोलीस मुख्यालयासह नेमून दिलेल्या ठिकाणी कर्तव्य बजावत आहेत. यातून होणारे अर्थपूर्ण देवाणघेवाण पूर्णपणे बंद झालेली आहे. त्यामुळे नवी मुंबई पोलीस मुख्यालय गेल्या काही दिवसांपासून अक्षरशा गजबजलेले दिसून येत आहे. जे या अगोदर दिसत नव्हते अशा व्हीआयपी कर्मचाऱ्यांचे दर्शन घडू लागले आहे. या कागदावर ड्युटी करणाऱ्यांनी कोणताही कामचुकारपणा करू नये किंवा व्हीआयपी संस्कृती यापुढेही सुरू राहू नये या उद्देशाने नवी मुंबई पोलीस मुख्यालयामध्ये बायोमेट्रिक हजेरी सुरू करण्यात आली आहे. यासाठी तीन मशीन बसवण्यात आल्या असून सर्व अंमलदारांचे थम  इम्प्रेशन घेण्यात आले आहे. यामुळे मुख्यालयामध्ये मोठ्या प्रमाणात पारदर्शकता निर्माण झाली आहे. काही कर्मचाऱ्यांना पोलीस ठाण्यामध्ये पुढील आदेश येईपर्यंत भांडण्यात आले आहे.त्यामुळे पोलीस ठाण्यात अतिरिक्त कुमक पोहोचली आहे.


चौकट - 
सर्व्हिस सीट अपडेट करण्याचे आदेश

नवी मुंबई पोलीस आयुक्तालयात कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांचे सर्व्हिस  सीट अपडेट करण्याचे आदेश पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांनी दिले आहेत. दरम्यान वाहतूक सह इतर क्रीम पोलीस ठाण्यात दोन किंवा तीन टर्म काम करणाऱ्यांची या माध्यमातून माहिती घेतली जाणार आहे. तसेच येत्या दोन-तीन महिन्यांमध्ये पोलीस खात्यात अमुलाग्र बदल दिसतील असे दस्तर खुद्द तळोजा पोलीस ठाण्यात आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमात आयुक्त मिलिंद भारंबे यांनी जाहीरपणे सांगितले.
Comments