तरुण पिढीने उच्च शिक्षण घ्यावे त्यांच्या पाठीशी पनवेल एज्युकेशन सोसायटी नेहमीच उभी आहे - आ. प्रशांत ठाकूर..
पनवेल एज्युकेशन सोसायटी नेहमीच उभी आहे -  आ. प्रशांत ठाकूर

 पनवेल दि ०२ (संजय कदम) :  आजची तरुण पिढी ही आपल्या देशाचे भवितव्य असल्याने त्यांनी  उच्च शिक्षण घ्यावे त्यांच्या पाठीशी पनवेल एज्युकेशन  सोसायटी नेहमीच ठामपणे उभी  असल्याचे प्रतिपादन पनवेल चे आमदार प्रशांत ठाकूर यांनी पनवेल एज्युकेशन सोसायटी तर्फे आयोजित ऍन्युअल सोशल गॅदरिंग - २०२२-२३ च्या कार्यक्रमानिमित्त प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असताना केले.
                  यावेळी आ. प्रशांत ठाकूर यांच्यासह  पनवेल एजुकेशन सोसायटीचे चेअरमन इकबाल हुसेन काझी, वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय कादबाने, पोलीस निरीक्षक शिंदे, मा. नगराध्यक्ष सईद मुल्ला, नूर पटेल, मा. नगरसेवक मुकीत काझी, अनिफ पटेल, असिफ करेल, हनीफ मास्टर, उस्मान गुलाब हुसेन पटेल, नाविद पटेल, जवाद पटेल,  आसिफ सकुर, खामकर यांसह विविध शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक वर्ग व इतर मान्यवर उपस्थित होते.
   पनवेल एज्युकेशन  सोसायटीच्या याकूब बेग हायस्कुल व ज्युनियर कॉलेज, याकूब बेग प्रायमरी स्कुल, पी.ई. एस. इंग्लिश स्कुल व जुनियर कॉलेज, नॅशनल उर्दू प्रायमरी स्कुल तळोजा, नॅशनल उर्दू हायस्कुल व ज्युनियर कॉलेज तळोजा, अँग्लो उर्दू हायस्कुल बारापाडा या शाळेतील विद्यार्थी वर्ग पनवेल येथील रॉयल गार्डन , जामा माज्जिद प्लॉट, तहसीलदार कार्यालयाजवळ येथे मोठ्या संखेने उपस्थित होते. यानिमित्ताने विविध विद्यार्थ्यांनी आपले कलागुण सादर केले तसेच यशस्वी विद्यार्थ्यांना बक्षीस मान्यवरांच्या हस्ते देण्यात आले.  यावेळी बोलताना आ. प्रशांत ठाकूर यांनी सांगितले की पनवेल एज्युकेशन सोसायटीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना घडविण्याचे काम केले जाते आज अनेक विद्यार्थी उच्च  स्तरावर   आहेत तर आगामी काळात अनेक विद्यार्थिनी व विद्यार्थी आपल्याला विविध उच्च  स्तरावर  काम करताना दिसणार आहेत. त्या सर्वांचे मी अभिनंदन करून शुभेच्छा देत असल्याचे त्यांनी सांगितले तर यावेळी बोलताना  पनवेल एजुकेशन सोसायटीचे चेअरमन इकबाल हुसेन काझी यांनी सांगितले कि आम्ही विद्यार्थी घडविण्याचे काम सातत्याने करीत असतो त्यांच्यासाठी उच्च शिक्षण प्रणाली, शिक्षित शिक्षक व सर्व सोयी सुविधा त्यांना पुरवीत असतो व सर्वांना चांगलं शिक्षण कसे मिळेल याकडे आम्ही लक्ष देतो त्यामुळेच आमचे विद्यार्थी सर्व स्तरावर यशस्वी होताना दिसत आहे. याचा मला आनंद होत असल्याचे त्यांनी सांगितले. अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात हा कार्यक्रम संपन्न झाला.
फोटो -   आ. प्रशांत ठाकूर व   वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय कादबाने यांचा सत्कार (छाया - अक्षय शार्दूल)
Comments