पनवेल पंचायत समिती आणि जिल्हा परिषद निवडणुकीत पनवेल तालुक्यातून नोटाला ७ हजार २०१ मते...
पनवेल पंचायत समिती आणि जिल्हा परिषद निवडणुकीत पनवेल तालुक्यातून नोटाला ७ हजार २०१ मते...
पनवेल /प्रतिनिधी - : पनवेल पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत पनवेल तालुक्यातून नोटाला 7 हजार 201 मते मिळाली आहेत. यातील 3 हजार 553 मते जिल्हा परिषदेला तर 3 हजार 648 मते पनवेल पंचायत समितीला मिळाली.
           जिल्हा परिषद आणि पनवेल पंचायत समितीची निवडणूक सात फेब्रुवारी रोजी पार पडली. तर 9 फेब्रुवारी रोजी मतमोजणी पनवेल शहरातील व्हीके हायस्कूल येथील मतमोजणी केंद्रात पार पडली. यावेळी भाजपने शेकाप महाविकास आघाडीचा धुव्वा उडवत एकहाती सत्ता प्रस्थापित केली. यावेळी नागरिकांनी नोटाला देखील आपली पसंती दिली आहे. जिल्हा परिषदेच्या आठ मतदार संघातून वडघर मध्ये नोटाला सर्वाधिक 650 मते मिळाली तर सर्वात कमी वावेघर मतदार संघात 296 मते मिळाली. पंचायत समितीच्या करंजाडे गणात नोटाला सर्वाधिक 482 मते मिळाली. तर सर्वात कमी वावंजे गटात नोटाला 93 मते मिळाली. नोटाला पसंती देणारांना उभे असलेल्या उमेदवारांपैकी एकही योग्य वाटला नाही. त्यामुळे त्यांनी 'नोटा'चे बटण दाबले आहे.

Comments