पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांना उत्कृष्ट तपास बद्दल गुन्हे शाखा कक्ष ३ चे वपोनी शत्रुघ्न माळी यांनी केले सन्मानित...
वपोनी शत्रुघ्न माळी यांनी केले सन्मानित...

पनवेल / दि.०९(संजय कदम):  एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून पसार झालेल्या आरोपीचा कसोशीने शोध घेतल्याबद्दल नवी मुंबईचे पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांनी गुन्हे शाखा कक्ष ३ चे वपोनी शत्रुघ्न माळी यांचा विशेष सत्कार केला आहे.  
           नेरूळ येथे एका गार्डन मध्ये रात्री अंधारात मित्रांसोबत बसलेल्या एका 16 वर्षीय मुलीवर एका अज्ञात इसमाने बलात्कार केला होता. सदर घटना घडून महिना झाला तरी आरोपी निष्पन्न होत नव्हता. त्यावेळी आरोपीने कोणताही पुरावा सोडला नव्हता. अत्यंत अवघड असा तपास गुन्हे शाखा कक्ष 3 चे वरीष्ठ पोलीस निरीक्षक शत्रुघ्न माळी यांचेकडे सोपविण्यात आला असता, शत्रुघ्न माळी व त्यांच्या विशेष पथकाने दिवसरात्र तपास करून पोलीस उपायुक्त अमित काळे, सहाय्यक पोलीस आयुक्त वस्त यांच्या मार्गदर्शनानुसार यातील आरोपीस अटक केली म्हणून किचकट गुन्ह्याचा कसोशीने तपास केल्याबद्दल नवी मुबंईचे पोलीस आयुक्त मिलिंद भांरबे यांनी बेस्ट डिक्टेशन चा पुरस्कार देवुन गुन्हे शाखा कक्ष ३ चे वरीष्ठ पोलीस निरीक्षक शत्रुघ्न माळी यांना प्रशास्तिपत्रक पत्रक देऊन सन्मानित केले.
फोटो : वरीष्ठ पोलीस निरीक्षक शत्रुघ्न माळी सन्मान
Comments
Popular posts
'शौर्यम दिवस' के मौके पर 'शौर्यम ट्रिब्यूट बाइक राइड' का आयोजन...
Image
नवीन पनवेल मध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) तर्फे एसटी स्मार्ट कार्ड वाटप...
Image
स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाच्या युथ रिपब्लिकनचे रायगड जिल्हाध्यक्ष महेश साळुंखेंची पेणमध्ये सदिच्छा भेट ; बौद्ध महासभेच्या कार्यक्रमाला उपस्थिती
Image
हृदयाच्या आरोग्यासाठी खारघरमध्ये 'वॉकेथॉन' ; जागतिक हृदय दिनानिमित्त मेडिकव्हर हॉस्पिटल्सचा उपक्रम...
Image
उड्डाणपुलाखालील मोकळ्या जागेत क्रीडांगण उभारण्याची मागणी ; नगरसेवक ऍड.मनोज भुजबळ यांचे महापौरांना निवेदन
Image