पनवेल मध्ये रासपचा कोकण विभागीय मेळावा ; माजी मंत्री आ.महादेव जानकर यांचे प्रमुख मार्गदर्शन..
आ.महादेव जानकर यांचे प्रमुख मार्गदर्शन..

पनवेल / प्रतिनिधी :- राष्ट्रीय समाज पक्षाचा कोकण विभागीय कार्यकर्ता  मेळावा  मंगळवार  २१  फेब्रुवारी २०२३  रोजी दुपारी २ वाजता पनवेल येथील आद्यक्रांतिकारक  वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात  राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक अध्यक्ष, माजी मंत्री आमदार महादेव जानकर यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजित करण्यात आला आहे . या कार्यकर्ता मेळाव्याला मोठ्या संख्येने कोकण विभागातील रासप कार्यकर्त्यांनी  उपस्थित राहावे असे  आवाहन  रासपचे  कोकण  विभागीय अध्यक्ष भगवान ढेबे यांनी केले आहे, 
          या मेळाव्यात  माजी मंत्री आमदार महादेव जानकर हे  कोकणातील कार्यकर्त्यांशी सवांद साधणार आहेत, या   कोकण विभागीय मेळाव्यासाठी राष्ट्रीय समाज पक्षाचे एम्प्लॉईज फेडरेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष एस एल अक्कीसगर , राष्ट्रीय सरचिटणीस  कुमार सुशील,राष्ट्रीय संघटक बाळकृष्ण लेंगरे, महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष काशीनाथ शेवते व महाराष्ट्र मुख्य महासचिव,ज्ञानेश्वर माऊली सलगर व महाराष्ट्रातून इतर वरिष्ठ कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत.
      राष्ट्रीय समाज पक्षाची  सध्यस्थीतीत   महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात घौडदौड चालू केली आहे . सगळीकडे पक्ष संघटना वाढीसाठी प्प्रयत्न चालू आहेत त्या पार्श्वभूमीवर  रासप प्रमुख  आ. महादेव जानकर  हे  संपूर्ण राज्यभर सभा, दौरे घेत आहेत .पनवेल येथील कार्यकर्ता मेळाव्यात  ते कार्यकर्त्यांनी सवांद साधणार आहेत, तर आगामी काळात येणाऱ्या निवडणूका आणि पक्षाची ध्येयधोरणे या विषयावर कार्यकर्त्याशी संवाद साधणार आहेत त्यामुळे या मेळाव्याला पालघर ठाणे, रायगड रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यातील  कार्यकर्त्यांनी मोठया संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन रासपचे कोकण विभागीय अध्यक्ष भगवान ढेबे यांनी केले आहे,
Comments