खेळाडूंच्या सरावाला बाळासाहेबांच्या शिवसेनेचे संपर्कप्रमुख रामदास शेवाळे यांचा मदतीचा हात..
 रामदास शेवाळे यांचा मदतीचा हात...  
पनवेल वैभव  / दि.०७ (संजय कदम) : कबड्डी व मॅरॅथॉन मध्ये राज्यस्तरीय स्पर्धेत सहभाग घेणाऱ्या खेळाडूंच्या सरावासाठी बाळासाहेबांच्या शिवसेनेचे संपर्कप्रमुख रामदास शेवाळे यांनी मदतीचा हाथ पुढे करत त्यांना सरावासाठी मोफत सेफ्टी किट दिले तसेच सरावासाठी लागणारे सेटअप देण्याचे जाहीर केले.
कळंबोली सेक्टर 3 येथील कबड्डी व मॅरॅथॉन मध्ये राज्यस्तरीय स्पर्धेत सहभाग घेणाऱ्या खेळाडूंनी बाळासाहेबांच्या शिवसेनेचे संपर्कप्रमुख रामदास शेवाळे यांची भेट घेऊन सरावासाठी सेफ्टी किट तसेच लागणारे सेटअप यांची अडचण होत असल्याचे सांगितले. खेळाडूंची व्यथा एकून त्यांना मदत करण्याचे आश्वासन दिले तसेच त्यांना सरावासाठी मोफत सेफ्टी किट देऊन सरावासाठी लागणारे सेटअप देण्याचे जाहीर केले. याबद्दल या खेळाडूंनी रामदास शेवाळे यांचे आभार मानले.
फोटो : खेळाडूंच्या सरावाला बाळासाहेबांच्या शिवसेनेचे संपर्कप्रमुख रामदास शेवाळे यांचा मदतीचा हात
Comments