दुधे विटेवरी कॉम्प्लेक्स मध्ये शिवजयंती कार्यक्रम उत्साहात संपन्न...
दुधे विटेवरी कॉम्प्लेक्स मध्ये शिवजयंती कार्यक्रम उत्साहात संपन्न...

पनवेल/प्रतिनिधी :-- 
दुधेविटेवरी कॉम्पेक्स सेक्टर ३ A, कंरजाडे येथे दूधे बिल्डर्स आयोजित छत्रपती शिवाजी महाराज जयंती (शिवजयंती) कार्यक्रम यंदाही अतिशय जल्लोषात साजरा झाला. कार्यक्रमाची सुरुवात महाराजांच्या प्रतिमा पूजनाने झाली. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी समीर रामचंद्र खरे यांनी व्याख्यान सादर केले. तसेच सोनल किशोर मेहरोळे यांचे लाठीकाटी, तलवार, भाला यांचे प्रात्यक्षिक सादरीकरण केले.

यावेळी दुधे बिल्डर्सचे डायरेक्टर तुकाराम उकिर्डा दुधे, विकी दुधे यांच्यासह दुधे विटेवरी महिला मंडळ व सर्व रहिवाशी उपस्थित होते. 

करंजाडे ही नव्याने विकसित झालेले शहर आहे. या शहरांमध्ये तुकाराम दुधे बिल्डर्स हे एकमेव बिल्डर्स आहेस जे सलग गेले चार वर्ष आपल्या सदनिकेच्या आवारात स्वतः शिवजयंती उत्सव साजरा करतात. हा उत्सव साजरा करण्यामागे एक उद्दिष्ट आहे की आपला इतिहास आणि स्वराज्य कसे निर्माण झाले हे भावी पिढीला समजले पाहिजे. प्रत्येक घरात आदर्श व्यक्तिमत्व श्री छत्रपती शिवाजी महाराज तसेच जिजामाता पोहचले पाहिजे. तसेच दरवर्षी सोसायटीतील मुलां-मुलीं सोबत तसेच सदनिकेच्या बाहेरील आदिवासी पाड्यातील आणि इतर मुलांनाही कार्यक्रमात सहभाग करून त्यांच्या कलागुणांना प्रोत्साहन देण्याचे सामाजिक काम तुकाराम दूधे हे करीत असतात. सुप्रसिद्ध शिवचरित्र व्याख्याते समीर रामचंद्र खरे या कार्यक्रमाला वक्ते म्हणून लाभले होते. त्यांच्या वक्तृत्वातून शिवचरित्र ऐकताना ऐकणाऱ्यांच्या अंगावर रोमांच उभे राहिले होते. कार्यक्रमाची सांगता शिवचरित्र सांगून झाली. यावेळी दुधे विटेवरी महिला मंडळ उपस्थित होते.
Comments