यशवंत मेमोरियल ट्रस्टच्या माध्यमातून दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी मोफत इंग्रजी विषयाचे मार्गदर्शन शिबीर...
मोफत इंग्रजी विषयाचे मार्गदर्शन शिबीर...

पनवेल / दि.१०(संजय कदम) पनवेल शहरातील यशवंत मेमोरियल ट्रस्टच्या माध्यमातून दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी  मोफत इंग्रजी विषयाचे मार्गदर्शन शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे.  

              रविवार दिनांक १२ फेब्रुवरी २०२३ रोजी १० वी च्या विद्यार्थ्यांसाठी इंग्रजी विषयाचे (इंग्रजी माध्यम वेळ सकाळी ९ ते १०.३० आणि मराठी सेमी इंग्रजी माध्यम वेळ सकाळी ११ ते १२.३०) मोफत मार्गदर्शन आयोजित केले आहे. बोर्डाच्या प्रश्नपत्रिकेचे स्वरूप, इंग्रजी व्याकरण, प्रश्नांची अचूक उत्तरे कशी लिहावीत याचे शंका समाधान तज्ज्ञांद्वारे केले जाईल. नाव नोंदणी साठी आपले नाव, माध्यम व कॉन्टॅक्ट नंबर 9619313779 / 9372063321 / 9372382425 येथे व्हाट्सअप करा किंवा अधिक माहितीसाठी यशवंत मेमोरियल ट्रस्ट अशोका गार्डन्स धूतपापेश्वर आयुर्वेदिक कारखान्याच्या बाजूला महात्मा फुले मार्ग पनवेल येथे संपर्क साधावा.
Comments