खासदार श्रीरंग बारणे यांच्या वाढदिवसानिमित्त मोफत नेत्र चिकित्सा व चष्मे वाटप शिबिर...
मोफत नेत्र चिकित्सा व चष्मे वाटप शिबिर...

पनवेल वैभव  /दि.१५ (संजय कदम) : मावळ लोकसभा मतदारसंघातील बाळासाहेबांची शिवसेनेचे लोकप्रिय खासदार श्रीरंग उर्फ आप्पा बारणे यांच्या वाढदिवसानिमित्त बाळासाहेबांची शिवसेनेचे रायगड जिल्हा संपर्कप्रमुख रामदास शेवाळे यांच्या मार्फत  मोफत नेत्र चिकित्सा व मोफत चष्मे वाटप शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
गुरुवार १६ फ्रेब्रुवारी रोजी सकाळी 10 ते दुपारी 2 च्या दरम्यान बाळासाहेबांची शिवसेनेच्या कळंबोली सेक्टर 3ई शॉप नं.1, ब्लॅकम्निवी मुंबई प्लॉट नंबर 18 येथील मध्यवर्ती कार्यालयात हे मोफत नेत्र चिकित्सा व मोफत चष्मे वाटप शिबिर होणार आहे. तरी जास्तीत जास्त नागरिकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन बाळासाहेबांची शिवसेनेचे रायगड जिल्हा संपर्कप्रमुख रामदास शेवाळे यांनी केले आहे.


फोटो : आरोग्य शिबिर
Comments