१८ जानेवारीला महिलांकरिता सांस्कृतिक कार्यक्रम....


रायगड जिल्हा वैश्य वाणी समाज महिला मंडळाच्या वतीने महिलांकरिता सांस्कृतिक कार्यक्रम 

पनवेल / प्रतिनिधी : - रायगड जिल्हा वैश्य वाणी समाज महिला मंडळाच्या वतीने महिलांकरिता सांस्कृतिक कार्यक्रम बुधवार दिनांक  18 जानेवारी 2023 रोजी सायंकाळी  5 ते रात्री 9 वाजेपर्यंत रिद्देश रिसॉट टाटा रोड वैजनाथतालुका कर्जत येथे होणार आहे. या कार्यक्रमासाठी महाराष्ट्र राज्य विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरमहाराष्ट्र राज्य शालेय शिक्षण मंत्री दिपक केसरकरआमदार सदानंद सरवणकरउद्योजक विश्वनाथ पनवेलकरतसेच ठाणेपालघर जिल्हा वैश्य वाणी समाज मंडळाचे अध्यक्ष विजय निकते या सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे. या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन अशोक भोपतरावअध्यक्ष  रायगड वैश्य वाणी समाज संघशामल आंग्रे,अध्यक्ष रायगड महिला मंडळ संघमनोज आंग्रेअध्यक्ष युवक अध्यक्ष रायगड जिल्हा वैश्य वाणी समाज संघ यानी केले आहे. 

Comments