वाचन संस्कृतीला चालना देण्यासाठी वाचनालयांचे लोकार्पण : दामोदर पाटील...

नागरी सुविधांसाठी प्रकल्पग्रस्थांचा अजूनही संघर्ष ...

पनवेल/प्रतिनिधी -- आजच्या डिजीटल युगात वाचन संस्कृती हरवत चालली असून तिचे जतन करण्यासाठी करंजाडे वसाहतीतील सेक्टर 2 येथील मैदानावर स्व. दी.बा.पाटील साहेब जेष्ठ नागरिक सार्वजनिक वाचनालय चिंचपाडा ग्रामस्थ्यांच्या सहकार्यातून बांधण्यात आले आहे. त्या वाचनालयांचे लोकार्पण माजी सरपंच दामोदर धर्मा पाटील यांच्या हस्ते रविवारी दिनांक 1 जानेवारी रोजी सकाळी करण्यात आले. यावेळी ते वाचनालयांच्या लोकार्पण कार्यक्रमात बोलत होते.

यावेळी दामोदर धर्मा पाटील माजी सरपंच, कार्यक्रमाचे  अध्यक्ष अनंत शंकर केणी, माजी गाव अध्यक्ष प्रमुख पाहुणे म्हणून सी.टी.पाटील (27 गाव उपाध्यक्ष) जगवंत परदेशी (माजी अध्यक्ष), रमेश शामजी पाटील, शशीकांत भगत, बामा केणी, चांगा भोईर, मोहन गावंड 77 प्रभाकर गावंड, हरीचंद्र मुंडकर सावळाराम केणी, सतीश केणी, रमेश तुराचे, परेश केणी, विठ्ठल लटके, प्रकाश केणी, जगदीश केणी, कमलाकर मुंडकर, मदन केणी, नंदकुमार केणी, एकनाथ केणी यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पासाठी नऊ गावासह चिंचपाडा ग्रामस्थांचे स्थलांतर करण्यात आले आहे. त्याचबरोबर सिडकोद्वारे नव्याने विकसित होत असलेली करंजाडे वसाहतीमध्ये नागरि हक्क आणि सुविधांसाठी येथील ग्रामस्थांचा अजूनही संघर्ष सुटलेला नाही. करंजाडे वसाहतीत गार्डन, रस्ते, पाणी, खेळण्यासाठी मैदाने यांचा अजूनही आभाव आहे. सिडको या सुविधा देण्यासाठी टाळाटाळ करीत असल्याचा आरोप स्थानिक करीत आहेत. मात्र सिडकोच्या सुविधांची वाट न बघता त्याचबरोबर नेहमी सामाजिक कार्यात अग्रेसर असणाऱ्या चिंचपाडा ग्रामस्थांनी एकत्रित येत येथील वसाहतीतील सेक्टर 2 येथील मैदानावर 
स्व.दी.बा.पाटील साहेब जेष्ठ नागरिक सार्वजनिक वाचनालय स्वखर्चातून बांधण्यात आले आहे. यावेळी या वाचनालयामुळे व्यक्तीमत्व विकासासाठी वाचन संस्कृती अत्यंत पोषक आहे. वाचनामुळेच सुसंस्कृत समाज वाढीस मदत होणार आहे. समाजात वाचन संस्कृती वाढावी यासाठी या वाचनालयचा उपयोग होणार आहे. यावेळी उपस्थित मान्यवरांनी आपले मनोगते व्यक्त केले.
Comments