महाविकास आघाडीचे उमेदवार बाळाराम पाटील यांना विजयी करण्यासाठी शिवसेना एक पाऊल पुढे असणार - रायगड जिल्हा संपर्क प्रमुख बबनदादा पाटील...
रायगड जिल्हा संपर्क प्रमुख बबनदादा पाटील..

पनवेल वैभव / दि.20 (संजय कदम) : पूर्वीची कोकण शिक्षक मतदार संघाची निवडणूक हि शेकाप-काँग्रेस-राष्ट्रवादी यांनी एकत्र लढून विजय मिळवला होता. आता तर या निवडणुकीत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) त्यांच्यासोबत मैदानात उतरली असल्याने महाविकास आघाडीचे उमेदवार बाळाराम पाटील यांचा दुसऱ्यांदा विजय निश्चित असून यासाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) एक पाऊल पुढे असणार असे प्रतिपादन आज पनवेल शहरातील ज्येष्ठ नागरिक सभागृह येथे आयोजित महाविकास आघाडीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या जाहीर मेळाव्यात शिवसेना रायगड जिल्हा संपर्क प्रमुख बबनदादा पाटील यांनी केले.   

या मेळाव्याला जिल्हा संपर्कप्रमुख बबनदादा पाटील, काँग्रेस रायगड जिल्हाध्यक्ष महेंद्र घरत, शेकाप नेते जे एम म्हात्रे, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आर सी घरत, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सतीश पाटील, ज्येष्ठ नेते जी आर पाटील, उपजिल्हाप्रमुख रामदास पाटील, दीपक निकम, योगेश तांडेल, प्रदीप ठाकूर, शशिकांत डोंगरे, एकनाथ म्हात्रे, विश्वास पेटकर, महिला आघाडीच्या उपजिल्हा संघटक कल्पना पाटील, काँग्रेसच्या नेत्या श्रुती म्हात्रे, ज्ञानेश्वर बडे, सुदाम पाटील, मा.विरोधीपक्ष नेते प्रीतम म्हात्रे आदींसह महाविकास आघाडीचे पदाधिकारी व्यासपीठावर मोठ्या संख्येने उपस्थित होते. 
यावेळी बोलताना बबनदादा पाटील यांनी सांगितले कि, शिवसेनेचा कोकण हा पूर्वीपासून बालेकिल्ला आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांनी हि निवडणूक प्रतिष्ठेची बनवली आहे. त्यामुळे जास्तीत जास्त मतदान बाळाराम पाटील यांना होणार आहे व निश्चितच आपण पहिल्या फेरीपासून आघाडीवर असू असा विश्वास बबनदादा पाटील यांनी व्यक्त केला आहे. तर काँग्रेस रायगड जिल्हाध्यक्ष महेंद्र घरत यांनी सुद्धा भाजपसह मिंधे सरकारवर जोरदारपणे टीका करीत कार्यकर्त्यांनी घराघरात जाऊन शिक्षक मतदार संघाचे उमेदवार बाळाराम पाटील यांचा प्रचार केला पाहिजे. शिक्षकांची भेट घेऊन बाळाराम पाटील यांनी केलेले सहा वर्षातील शिक्षकांसाठी केलेले योगदान सांगितले पाहिजे. या निवडणुकीत शिवसेना आपल्या बरोबर आहे त्यामुळे ज्याप्रमाणे पनवेल अर्बन बँकेची निवडणूक आपण एक हाती जिंकलो तशीच हि निवडणूक सुद्दा आपण जिंकू हि काळ्या दगडावरची पांढरी रेघ असल्याचे सांगितले. यावेळी उपस्थित मान्यवरांनी बाळाराम पाटील यांना विजयी करण्याचे आवाहन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुप्रसिद्ध निवेदक हरेश मोकल तर आभार प्रदर्शन मा. विरोधीपक्ष नेते प्रीतम म्हात्रे यांनी केले.            





फोटो : महाविकास आघाडीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या जाहीर मेळाव्यात शिवसेना रायगड जिल्हा संपर्क प्रमुख बबनदादा पाटील मार्गदर्शन करताना (छाया : संजय कदम)
Comments
Popular posts
पनवेल कृषी उत्पन्न बाजार समितीवर महाविकास आघाडीचा झेंडा ; सभापतीपदी नारायणशेठ घरत तर उपसभापतीपदी सुनील सोनावळे यांची बिनविरोध निवड....
Image
पनवेल एजुकेशन सोसायटी संचालित याकुब बेग हायस्कूल व जुनियर कॉलेज व पी.ई.एस इंग्लिश जुनियर कॉलेजचे बारावी परीक्षेत दिमाखदार यश..
Image
पोलीसकन्या श्रुती सुभाष कोकाटे हिचे केंद्रीय लोकसेवा आयोग (UPSC) परीक्षेत सुयश..
Image
हार्ट अटॅक प्रसंगी उपयुक्त ठरणाऱ्या AED मशिन चे रोटरी क्लब ऑफ पनवेल सेंट्रल व न्यू पनवेल च्या मार्फत लोकार्पण.....
Image
आगामी काळात उद्धव ठाकरेंना जनता उत्स्फूर्त पाठिंबा देईल - शेकाप राज्य सरचिटणीस आ.भाई जयंत पाटील
Image