युवकांच्या खेळाच्या मैदानांसाठी कामगार नेते महेंद्र घरत मैदानात ...

युवकांच्या खेळाच्या मैदानांसाठी कामगार नेते महेंद्र घरत मैदानात ...

 

पनवेल : - सिडको व्यवस्थापनाने प्रकाल्पग्रस्तांच्या जमिनी संपादीत करून ५० ते ६० वर्ष आस्तित्वात असलेल्या प्रकल्पग्रस्त युवकांच्या मैदानावर रहिवाशी घरांसाठी इमारती उभारून सर्व गावांची पारंपारीक मैदाने गिळंकृत केली तर काही NMSEZ यांच्या घशात घातली . त्यामुळे युवकांना खेळण्यासाठी मैदानेच शिल्लक नाहीत. सिडको नियोजन विभागाने शाळांसाठी आरक्षित भुखंडासमोर मैदानांचे आरक्षण करून कॉमन प्ले ग्रांउडची रचना नोडल मध्ये केली . परंतु शैक्षणीक संस्थानी वॉल कंपाऊंड घालून ही मैदाने संस्थेच्या  मालकीसाठी ताब्यात घेतली, सिडकोचे हे धोरण चुकलेले आहे . 

सिडको विमानतळन्हावा शिवडी मार्गनेरूळ – उरण रेल्वे, आर. आर. पॅकेज यासाठी भूसंपादन करताना सिडको व्यवस्थापनास सोबत चातुर्याने वाटाघाटी करून सगळ्या प्रकल्पग्रस्तांना नवी मुंबई विमानतळा प्रमाणे साडेबावीस टक्केचे पॅकेज मिळवून देत कामगार नेते महेंद्र घरत यांनी शेलघरकोपरगव्हाण या गावांना  नवीन खेळांची मैदाने तयार करून घेतली तर बामणडोंगरी मोरावेजावळेधुतुमपागोटेकोटनाका,  बोकडविरागावांसाठी आश्वासन दिल्या प्रमाणे NMSEZ मधील मैदाने आरक्षित करावी म्हणून सिडको नियोजन, भूसंपादन, इंजिनियरिंग, सर्व्हे विभागाच्या अधिकाऱ्यां सोबत वरील गावांचा संयुक्तिक पाहणी दौरा करून ही मैदाने सोडावित म्हणून सिडको व्यवस्थापनाला सांगितले आहे.

Comments
Popular posts
पनवेल जवळील पाच पीर डोंगर येथे ट्रेकींगसाठी जावून भरकटलेल्या ८ पर्यटकांना पनवेल शहर पोलिस व स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने केले रेस्क्यु..
Image
दुबईतुन गुंतवणुकीचे खोटे आमिष देणाऱ्या टोळीतील एका आरोपीस "सायबर सेल" पनवेल यांनी शिताफीने केले जेरबंद ..
Image
पनवेल शहर परिसरातील चर्चमधील चोरीचे गुन्हे उघडकीस ; पनवेल शहर पोलिसांची धडक कारवाई..
Image
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले बाळासाहेब ठाकरे राज्यस्तरीय फिल्म फेस्टिवलच्या पोस्टरचे अनावरण..
Image
शेतकऱ्यांना सरसकट कर्ज माफी मिळण्यासाठी पनवेल शहर जिल्हा कॉंग्रेसतर्फे आंदोलन..
Image