रेजिंग सप्ताह अंतर्गत पनवेल तालुका पोलिसांच्या वतीने विविध समाजप्रबोधन कार्यक्रमाचे आयोजन....
 समाजप्रबोधन कार्यक्रमाचे आयोजन....
पनवेल / दि.१० (संजय कदम) : पोलीस रेजिंग डे सप्ताह निमित्ताने पनवेल तालुका पोलिसांमार्फत परिमंडळ २ चे पोलीस उपायुक्त पकंज डहाणे यांच्या मार्गदर्शनाखाली पनवेल परिसरात विविध समाजप्रबोधन उपक्रम  राबवण्यात आले. यामध्ये नशा मुक्ती व सायबर गुन्ह्याबाबत मार्गदर्शन, विद्यार्थ्यांची पोलीस ठाण्याला भेट, हत्यारांसह पोलीस कामकाजाची माहिती यांचा समावेश होता. 

पोलीस स्थापना दिनाचे औचित्य साधून ०२ जानेवारी ते ०८ जानेवारी रोजी दरम्यान "पोलीस रेजिंग" डे सप्ताह पनवेल तालुका पोलिसांच्या वतीने साजरा करण्यात आला. त्याअंतर्गत कोन गाव येथील सेंट झेवियर्स  स्कूलच्या विद्यार्थ्यांनी पनवेल तालुका पोलीस ठाण्याला भेट देऊन पोलीस ठाण्याचे कामकाज, उपलब्ध हत्यारांची माहिती घेतली. सदर कार्यक्रम पनवेल विभागाचे सहा. पोलीस आयुक्त भागवत सोनवणे यांच्या प्रमुख उपस्थितीतीत संपन्न झाला. या कार्यक्रमामध्ये वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल पाटील, पोलीस निरीक्षक जगदिश शेलकर, गोपनीय विभागाचे अंमलदार राजेन्द्र कुवर, सचिन होळकर व इतर अधिकारी तसेच कर्मचारीवर्ग यांचा सहभाग होता. यानिमित्ताने उपस्थितीत शाळेय विद्यार्थ्यांना खाऊंचे वाटप करण्यात आले. तसेच तालुक्यातील शेडुंग फाटा येथील सेंट विल्फ्रेड कॉलेजच्या विद्यार्थ्यांना समाजसेवक बशीर कुरेशी यांच्या आशा की किरण फाउंडेशन द्वारे नशा मुक्ती, सायबर गुन्हे, मानवी तस्करीबद्दल पथनाट्य व जागरूकता अभियान राबवण्यात आले. या वेगवेगळ्या सामाजिक बांधिलकीचे उपक्रम राबवल्याबद्दल पनवेल तालुका पोलिसांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.  

फोटो : पनवेल तालुका पोलिसांच्या वतीने रेजिंग सप्ताह अंतर्गत विविध समाजप्रबोधन कार्यक्रम आले राबवण्यात (छाया : संजय कदम)
Comments