आठ वर्षीय मुलाला फूस लावून पळवले ....
आठ वर्षीय  मुलाला  फूस लावून पळवले ....


पनवेल दि ०६, (वार्ताहर) : घराबाहेर खेळण्यासाठी बाहेर गेलेल्या आठ वर्षीय मुलाला कोणीतरी अज्ञात इसमाने अज्ञात कारणावरून फूस लावून पळवून नेल्याची घटना पनवेल शहरात घडली आहे. 
               शहरातील गणेश उददेकर यांच्या चाळीत राहणारा आठ वर्षीय मुलगा त्याचा बांधा मध्यम,  उंची ४ फूट, वर्ण गोरा, नाक सरळ असून ग्रे रंगाची पॅन्ट व निळ्या रंगाचा कॉलर चा टीशर्ट अंगात परिधान केला आहे. व त्याला मराठी व हिंदी भाषा अवगत आहे. या मुलाबाबत कोणाला अधिक माहिती असल्यास पनवेल शहर पोलीस ठाणे दूरध्वनी ०२२- २७४५२३३३ किंवा सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष शेट्ये यांच्याशी संपर्क साधावा.
Comments