बी.के.पाटील इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसीच्या वार्षिक क्रीडास्पर्धेला सुरुवात ...
बी.के. पाटील इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसीच्या वार्षिक क्रीडास्पर्धेला सुरुवात ...  

पनवेल / दि.१६ (वार्ताहर) : तळोजे येथील कमळ गौरी शिक्षण संस्थेचे बी.के. (बबन दादा) पाटील इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसीचे वार्षिक क्रीडा दिवसाचे संस्थेचे चेअरमन बबन दादा पाटील यांच्या हस्ते आज उदघाटन झाले.  
फार्मसी क्षेत्रात दर्जेदार व उच्च दर्जाचे शिक्षण देणारे कमळ गौरी शिक्षण संस्थेचे बी.के. (बबन दादा) पाटील इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसीचे वार्षिक क्रीडा दिवस मोठ्या उत्साहात पार पडला. या स्पर्धेचे उदघाटन संस्थेचे चेअरमन तथा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे रायगड जिल्हा संपर्कप्रमुख बबनदादा पाटील यांच्या हस्ते पार पडला. या स्पर्धेला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. यावेळी कॉलेजचे प्राचार्या मिताली मॅडम, हिवसे मॅडम, डॉ कांबळे सर, डॉ. साखरे सर, महाजन सर व कॉलेजचे विद्यार्थी इतर शिक्षक उपस्थित होते.फोटो : वार्षिक क्रीडा स्पर्धेचे बबन दादा पाटील यांच्या हस्ते उदघाटन
Comments